शंकर मराठे - मुंबई, २१ डिसेंबर २०२५ : ९० च्या दशकात बॉलीवूडवर ज्या अभिनेत्याने एकहाती राज्य केले, ज्याची कॉमेडी आणि ब्रेक डान्स पाहण्यासाठी चित्रपटगृबाहेर रांगा लागायच्या, तो सुपरस्टार म्हणजे 'गोविंदा'. 'हीरो नंबर १', 'कुली नंबर १' व 'राजा बाबू' सारख्या सुपरहिट चित्रपटांचा बादशहा आज मात्र मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाने आपल्या कारकिर्दीत केलेल्या ५ मोठ्या चुकांमुळे त्याचे स्टारडम धोक्यात आले. जाणून घेऊया त्या ५ प्रमुख चुका :
१. ब्लॉकबस्टर चित्रपटांना दिलेला नकार : रिपोर्ट्सनुसार, गोविंदाला 'गदर: एक प्रेम कथा', 'देवदास' (चुन्नीलालची भूमिका) आणि 'ताल' यांसारख्या चित्रपटांच्या ऑफर होत्या. मात्र, काही कारणास्तव त्याने या भूमिका नाकारल्या. हे चित्रपट पुढे जाऊन ब्लॉकबस्टर ठरले.
२. सेटवर उशिरा येण्याची सवय : गोविंदाच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरी, त्याच्या सेटवर उशिरा येण्याच्या सवयीमुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक त्रस्त असायचे. असे म्हटले जाते की, गोविंदा अनेकदा शूटिंगला तासनतास उशिरा येत असे. या अनप्रोफेशनल वर्तनामुळे हळूहळू मोठ्या बॅनरने त्याला काम देणे बंद केले.
३. डेव्हिड धवन सोबतचा वाद : गोविंदा आणि डायरेक्टर डेव्हिड धवन ही बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी जोडी मानली जात होती. या दोघांनी मिळून १७ सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, एका टप्प्यावर त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. डेव्हिड धवन यांनी नवीन पिढीच्या कलाकारांसोबत काम करण्यास सुरुवात केली आणि गोविंदाला हा बदल पचवता आला नाही.
४. फिटनेस व लूककडे दुर्लक्ष : साल २००० नंतर बॉलीवूडमध्ये ट्रेंड बदलला. हृतिक रोशन, सलमान खान सारखे अभिनेते फिटनेस आणि सिक्स-पॅक ॲब्सवर भर देत होते. दुसरीकडे, गोविंदाने आपल्या बदलत्या वयानुसार आणि काळाच्या गरजेनुसार फिटनेसकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही.
५. राजकारणात प्रवेश : जेव्हा गोविंदाचे करिअर शिखरावर होते, तेव्हा त्याने अचानक राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. साल २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून ते खासदार झाले. या काळात त्यांचे पूर्ण लक्ष चित्रपटांवरून हटून राजकारणाकडे गेले. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संपर्क गमावला आणि जेव्हा ते परतले, तेव्हा काळ बदलला होता.

No comments:
Post a Comment