Saturday, January 31, 2026

ह्या वेब सीरिजमध्ये पापी माणसांचा मृत्यू होतो?

शंकर मराठे - मुंबई, ३१ जानेवारी  २०२६ : झी ५ वर अंकुश चौधरी व प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'देवखेळ' ही वेब सीरिज ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाली आहे. ही एक क्राईम थ्रिलर सीरिज असून कोकणातील 'शिमगा' उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. गावात घडणाऱ्या गूढ मृत्यूंमागे 'शंकासुरा'चा कोप आहे अशी गावकऱ्यांची समजूत असते, मात्र इन्स्पेक्टर विश्वास यामागील सत्य शोधून काढण्यासाठी धडपडतो.

ह्या सीरिज मध्ये कोकणातल्या शिमगा उत्सवात कशा प्रकारे पापी माणसांचा मृत्यू होतो व ह्याचा शोध इन्स्पेक्टर विश्वास कसा लावणार आहे. हे तर नक्कीच पहा.


'द केरळ स्टोरी 2' चे वादळ पुन्हा येणार?

शंकर मराठे - मुंबई, ३१ जानेवारी  २०२६ : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या व बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणाऱ्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मात्यांनी आज 'द केरळ स्टोरी 2' चे पहिले मोशन पोस्टर रिलीज केले असून, ते पाहून सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या चित्रपटाचे मोशन पोस्टर अत्यंत वेदनादायी आणि अंगावर काटा आणणारे आहे. पोस्टरमध्ये काही मुलींचे रडणारे आणि भीतीने ग्रासलेले चेहरे दिसत आहेत. या मुलींचे डोळे खूप काही सांगून जात आहेत. पोस्टरसोबत "काही गोष्टी कधीच संपत नाहीत..." असा संदेश देण्यात आला आहे, जो चित्रपटाच्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधतो. हा सिनेमा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता 'द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड' काय नवीन वादळ निर्माण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Sunday, January 25, 2026

ज्येष्ठ तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार

शंकर मराठे - मुंबई, २५ जानेवारी  २०२६ : लोककलेचा वारसा जपणाऱ्या तमाशा कलाकारांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे. दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या तमाशा या लोककलेला पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणे म्हणजे कलेप्रती असलेल्या समर्पणाला आणि संघर्षाला मिळालेली लोकमान्यता आहे.

महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण लोककलाविश्वाचा गौरव आहे.


देवमाणूस मालिकेत रक्ताचा थरार!

 

शंकर मराठे - मुंबई, २५ जानेवारी  २०२६ : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस - मधला अध्याय'' सध्या एका अत्यंत उत्कंठावर्धक आणि थरारक वळणावर येऊन पोहोचली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आणि भागाच्या अपडेटनुसार, इन्स्पेक्टर जामकर यांची बहीण आर्या, हिचा मृतदेह चक्क फ्रीजमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मालिकेचे कथानक सध्या गुन्हेगारी विश्वातील क्रूरतेच्या परिसीमा ओलांडताना दिसत आहे. वाड्यामध्ये घडणाऱ्या गूढ हालचाली आणि गोपाळ व लावणीचे कारस्थान यामुळे प्रेक्षक आधीच संभ्रमात होते. त्यातच आता आर्याच्या हत्येचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाड्यातील फ्रीज उघडला असता, त्यातून आर्याचा निस्तेज देह बाहेर पडतो. हे दृश्य पाहून उपस्थित असलेल्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. हा मृतदेह तिथे कोणी आणि कधी लपवला, याचा त्यांना काडीमात्र सुगावा नाही.


Saturday, January 24, 2026

गणतंत्र दिवस के पहले सलमान खान का गाना...


शंकर मराठे - मुंबई, २४ जनवरी २०२६ :  सलमान खान की फिल्म 'बैटल ऑफ गलवान' का पहला गाना गणतंत्र दिवस से दो दिन पहले रिलीज हो गया है। इसमें संघर्ष के पलों और प्यार, बलिदान और देशसेवा के भाव को दिखाया गया है। इसे अरिजीत सिंह और श्रेया घोषाल ने गाया है। रिलीज होते ही ये ट्रेंडिंग लिस्ट में आ गया है।

'बैटल ऑफ गलवान' को सलमान खान ने फिल्म्स के बैनर तले प्रोड्यूस किया है, जबकि फिल्म के डायरेक्टर अपूर्व लाखिया हैं। इसका म्यूजिक सलमान खान फिल्म्स म्यूजिक लेबल से रिलीज हुआ है और सोनी म्यूजिक इंडिया इसकी ऑफिशियल म्यूजिक डिस्ट्रीब्यूशन पार्टनर है। फिल्म बहादुरी, बलिदान और जज्बे की कहानी दिखाने का वादा करती है, जिसमें चित्रांगदा सिंह भी लीड रोल में नजर आएंगी। 


Friday, January 23, 2026

डोंबिवलीत ‘पालखी’ या मराठी सिनेमाचा भव्य मुहूर्त

शंकर मराठे - मुंबई, २३ जानेवारी  २०२६ : डोंबिवली पूर्व मधील गणपती मंदीर येथे केएसआर फिल्म्स निर्मित ‘पालखी’ या पहिल्या मराठी चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सहकुटुंब उपस्थित राहून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. तसेच याप्रसंगी आयोजित पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन साईबाबांच्या प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेतले. 

साईबाबांवरील अढळ श्रद्धा, भक्तीची अखंड ज्योत आणि सेवाभावातून साकार होणारा भक्तीमय प्रवास म्हणजे ‘पालखी’ हा मराठी चित्रपट. साई पालखीचा महिमा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करणारा ठरेल. 

याप्रसंगी अभिनेते यतिन कार्येकर, सिद्धार्थ बोडके, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. 

थरारपट ‘सालबर्डी’

शंकर मराठे - मुंबई, २३ जानेवारी  २०२६ : इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Thursday, January 22, 2026

'देवमाणूस' मालिकेतून 'आर्या'चा प्रवास संपला

शंकर मराठे - मुंबई, २२ जानेवारी  २०२६ : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट आणि गोपाळ टेलरचा थरार प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवतो. आता या मालिकेतून एका महत्त्वाच्या पात्राने कायमची रजा घेतली आहे. 'देवमाणूस' मध्ये 'आर्या' ही भूमिका साकारणारी अभिनेत्रीचा हया मालिकेतील प्रवास संपला आहे.

अभिनेत्रीने सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या शेवटच्या सीनचे आणि शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने अतिशय सूचक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, "The end of the beginning". तिच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, तिने या मालिकेचा निरोप घेतला आहे.


Wednesday, January 21, 2026

Aamir Khan's dream project ‘Mahabharata’

Shankar Marathe - Mumbai,  21 January 2026  : Bollywood superstar Aamir Khan has opened up about his much-discussed dream project ‘Mahabharata’, addressing the question of when audiences can finally expect the epic to come to life. Aamir described Mahabharata as an extremely big responsibility, stating that it is not a project that can be made in a hurry or taken lightly.

The actor emphasized that he does not want to deliver substandard work on a subject that holds such deep cultural, historical, and emotional significance for Indians. According to Aamir, whenever he decides to work on Mahabharata, the goal will be to create something that makes every Indian truly feel proud.

He further shared that projects of this scale require immense preparation, the right technology, a strong creative vision, and complete dedication. Until all the elements come together perfectly, he prefers to wait rather than compromise on quality.

Aamir Khan’s statement has once again raised excitement and curiosity among fans, as Mahabharata remains one of the most ambitious and awaited cinematic projects in Indian cinema history.


लालीच्या भूमिकेचा क्रूर खुनी प्रवास

शंकर मराठे - मुंबई, २१ जानेवारी  २०२६ :  झी मराठीवरील 'देवमाणूस: मधला अध्याय' ही लोकप्रिय मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत किरण गायकवाडने रंगवलेल्या 'गोपाळ'च्या पात्राला तोंडीस तोंड देणारी व्यक्ती म्हणून 'लाली' समोर आली आहे. सुरुवातीला एक निरागस आणि साधी मुलगी म्हणून कथेत आलेली लाली आता एकापाठोपाठ एक खून करताना दिसत आहे. 

देवमाणूस मधील कथेत जेव्हा गोपाळ आणि लाली यांच्यामध्ये तिसरी व्यक्ती आली, तेव्हापासून लालीचे पात्र बदलत गेले. आपल्या प्रेमासाठी आणि अस्तित्वासाठी तिने हिंसक मार्ग पत्करला आहे.

या धक्कादायक वळणाबद्दल लाली म्हणजेच अभिनेत्री सोनम म्हसवेकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

लाली म्हणजेच सोनमच्या मते, लाली या पात्राचा आलेख इतका उंचावेल याची तिला सुरुवातीला कल्पना नव्हती. मात्र, आता प्रेक्षकांकडून तिला मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. प्रेक्षक मला म्हणतात की लाली तू फ्लॉवर नाही, तर फायर आहेस! विशेष म्हणजे, मी मालिकेत खून करत असूनही प्रेक्षकांना माझा राग येण्याऐवजी माझ्याबद्दल सहानुभूती वाटते. ही माझ्या अभिनयाची पावती आहे असे मला वाटते

Tuesday, January 20, 2026

देवमाणूस मध्ये लालीचा कट उघडकीस येणार ?

 

शंकर मराठे - मुंबई, २० जानेवारी  २०२६ : झी मराठीवरील 'देवमाणूस-मधला अध्याय' ही मालिका आता एका अत्यंत थरारक वळणावर पोहोचली असून, आजवर कधीही न घडलेली एक मोठी घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अजित (देवमाणूस) आपल्या स्वार्थासाठी लोकांचे बळी घेत आला आहे, पण यावेळी लालीने आपल्या नव-यासाठी सर्व मर्यादा ओलांडून एक भयंकर कट रचला आहे. रात्रीच्या अंधारात गावात नरकी उत्सवात 'मुखवट्यांचा खेळ' सुरू आहे आणि हीच संधी साधून लाली आर्याला नदीत बुडवून मारण्याचा प्रयत्न करते. 

मालिकेत आणखी एक मोठी कलाटणी तेव्हा येणार आहे जेव्हा हॉस्पिटलमध्ये साकेत जिवंत असल्याचे उघड होणार आहे. तो सध्या कोमामध्ये असला तरी ही बातमी अजितसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. आता इन्स्पेक्टर जामकर साकेतला पुन्हा गावात घेऊन आल्यामुळे अजितचे सर्व खोटे उघड होणार का ? आणि लालीने रचलेला हा संपूर्ण कट नेमका कसा होता, याचा थरार येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहता येणार आहे. 

Saturday, January 17, 2026

साउथ एक्टर धनुष करेंगे दूसरी शादी...

 

शंकर मराठे - मुंबई, १७ जनवरी २०२६ :  साउथ एक्टर धनुष अपनी पर्सनल लाइफ के कारण सुर्खियों में बने हुए हैं। ताजा खबर तो ये है कि वो वैलेंटाइन डे के दिन १४ फरवरी २०२६ को दूसरी शादी करने जा रहे हैं। जिनके साथ वो सात फेरे लेने जा रहे हैं, वो और कोई नहीं, हिंदी और साउथ की फेमस एक्ट्रेस मृणाल ठाकुर हैं। दावा किया जाता है कि दोनों एक-दूसरे को डेट कर रहे हैं। हालांकि, अभी तक दोनों में से किसी ने भी अफेयर या शादी को लेकर चुप्पी नहीं तोड़ी है।

धनुष और मृणाल ठाकुर एक-दूसरे को लंबे समय से डेट कर रहे हैं। अब ये जोड़ा अपने रिश्ते को शादी तक पहुंचाने की प्लानिंग कर रहा है। सूत्रों के अनुसार, धनुष और मृणाल की कथित शादी में सिर्फ परिवार के करीबी सदस्य और दोस्त शामिल होंगे। दोनों वैलेंटाइन डे के दिन 14 फरवरी को एक-दूजे के हमसफर बनेंगे।

Friday, January 16, 2026

अभिनेत्री निशा परुळेकरचा दणदणीत विजय

शंकर मराठे - मुंबई, १६ जानेवारी  २०२६ : रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निशा परुळेकर यांनी आता राजकारणाच्या क्षेत्रातही आपली उपस्थिती सिद्ध केली आहे. भाजपाच्या कमळ चिन्हावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी स्वीकारलेल्या निशा परुळेकर यांनी सर्व अडथळे पार करत प्रभाग क्रमांक २५ (आर-दक्षिण विभाग – कांदिवली / ठाकूर व्हिलेज परिसर) मधील महिलांसाठी राखीव जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे.

निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक २५ मध्ये बंडखोरीची परिस्थिती निर्माण झाली होती. शिंदे गटाचे स्थानिक नेते शेखर शेरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तसेच उबाठा पक्षातून माधुरी भोईर यांच्यासमोर देखील निशा परुळेकर यांना मोठे आव्हान होते. मात्र, मतदारांनी त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि काम करण्याच्या इच्छेवर विश्वास ठेवला, आणि त्यांना स्पष्ट बहुमत दिले.

या यशामुळे निशा परुळेकर राजकारणात फक्त एक नव्या चेहर्‍याप्रमाणे दिसत नाहीत, तर त्यांनी कलाकार आणि राजकारणी यांच्यातील अंतर कमी करण्याचे उदाहरण देखील सादर केले आहे. त्यांच्या विजयाने स्थानिक राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची प्रक्रिया अधिक सक्रिय होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Saturday, January 10, 2026

कमळी सीरियलच्या अन्नपूर्णा आजीची लव्हस्टोरी

शंकर मराठे - मुंबई, ११ जानेवारी  २०२६ : गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत अभिनेत्री इला भाटे हया दमदार भूमिकेत बघायला मिळाल्या. खरं तर त्यांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं पण कमी गुण मिळाल्याने त्यांनी डिएमएलटी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईत राहून स्वतःची लॅब चालवली. 

अभिनेत्री इला भाटे यांचे पती उदय भाटे हे डॉक्टर आहेत. मित्राची बहीण म्हणून इला यांना ते बायोलॉजी शिकवायला घरी येत होते. दोघांकडे लक्ष राहावं म्हणून शेजारी राहणाऱ्या इलाच्या मावशी सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असायच्या. पण बायोलॉजी शिकवता शिकवता दोघांचे प्रेमाचे सूर जुळले आणि घरच्यांनाही त्याचा सुगावा लागला. वय कमी असल्यामुळे घरच्यांनी लग्नाला थोडासा विरोध दर्शवला. पण दोघांचा समजूतदारपणा पाहून शिक्षण होताच साखरपुडा करून दिला आणि त्यानंतर मोठ्या थाटात त्यांनी लग्नही केलं. 

सध्या झी मराठीवर रात्री ९ वाजता प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका कमळी मध्ये कमळीच्या अन्नपूर्णा आजीची भूमिका अभिनेत्री इला भाटे साकारत आहे.

हया लवस्टोरी बद्दल एका लाइन मध्ये सांगता येईल की -  "बायोलॉजी शिकवता शिकवता, आयुष्याची केमिस्ट्री जुळली...."

वल्लरी विराजचा 'शुभ श्रावणी'च्या शूटिंग दरम्यान खांद्याला गंभीर दुखापत

शंकर मराठे - मुंबई, १० जानेवारी २०२६ : झी मराठीवर १९ जानेवारी २०२६ पासून दररोज संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या 'शुभ श्रावणी' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, अभिनेत्री वल्लरी विराजने नुकताच खुलासा केला आहे की, या मालिकेच्या प्रोमो आणि सुरुवातीच्या भागांच्या शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाला. या अपघातात तिच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून तिला फ्रॅक्चर बँडेज बांधावे लागले आहे. ह्याबद्दल वल्लरीने  सांगितले की, मालिकेचे शूटिंग कोल्हापूरमध्ये सुरू होते. एका सीनच्या वेळी तिचा अपघात झाला, ज्यामध्ये तिच्या खांद्याला मार लागला.



Friday, January 9, 2026

'बिग बॉस'च्या पहिल्या स्पर्धकाची झलक - 'फॅशन क्वीन' खरोखर आहे तरी कोण ?

शंकर मराठे - मुंबई, १० जानेवारी  २०२६ : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या साहव्या पर्वाचा बिगुल वाजला आहे. येत्या ११ जानेवारी २०२६ पासून हा शो सुरू होत असतानाच, कलर्स मराठीने पहिल्या स्पर्धकाचा एक धमाकेदार प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून "फॅशनच्या जगातील ही सुंदरी" नेमकी कोण, यावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

कलर्स मराठीने अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक एआय  जनरेटेड प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एक ग्लॅमरस महिला साडी नेसून दरवाजापाशी उभी असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओला "फॅशनच्या जगातील ही सुंदरी, भल्याभल्यांवर पडणार भारी!" असे कॅप्शन देण्यात आले आहे. या एका वाक्यामुळे ही स्पर्धक फॅशन किंवा लाइफस्टाइल क्षेत्राशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रोमोमध्ये स्पर्धकाचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, तिच्या देहबोलीवरून आणि कॅप्शनवरून चाहत्यांनी तर्क लावायला सुरुवात केली आहे. कमेंट सेक्शनमध्ये दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत: एक नाव आहे उर्मिला निंबाळकर तर दूसरे नाव सोनाली राऊत. मात्र, अधिकृत नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. आता ही 'फॅशन क्वीन' खरोखर कोण आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

यंदाचे पर्व देखील रितेश देशमुख होस्ट करणार आहेत. 'बिग बॉस'च्या नवीन घराचा प्रोमो आणि आता स्पर्धकांचे प्रोमो पाहता, यंदाचा सीझन अधिक भव्य आणि ग्लॅमरस असणार असल्याचे दिसून येत आहे. येत्या रविवारी, ११ जानेवारीला रात्री ८ वाजता होणाऱ्या ग्रँड प्रीमियरमध्ये या सर्व गुपितांवरून पडदा उठणार आहे.


बॉलिवूडची 'बबली गर्ल' श्रद्धा कपूर ...

शंकर मराठे - मुंबई, १० जानेवारी २०२६ : बॉलिवूडची 'बबली गर्ल' श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. ती लवकरच प्रसिद्ध मराठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित 'ईथा' या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्या बहुप्रतिक्षित 'नागिन' चित्रपटाचे शूटिंगही एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.





Thursday, January 8, 2026

हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’

शंकर मराठे - मुंबई, ९ जनवरी २०२६ : बॉलीवुड के चर्चित डायरेक्टर प्रियदर्शन की बहुप्रतीक्षित अक्षय कुमार स्टारर हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’ 15 मई को सभी सिनेमाघरों में दस्तक देगी।

'भूत बंगला' को एक कंप्लीट मनोरंजन फिल्म बनाने वाली सबसे बड़ी वजह इसकी दमदार स्टारकास्ट है, जिसमें अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, जिशु सेनगुप्ता, असरानी जैसे दिग्गज कलाकार शामिल हैं।

बंद झाले मुलांचे आवडते कार्टून ‘डोरेमॉन’

शंकर मराठे - मुंबई, ८ जानेवारी  २०२६ : इंडोनेशियातील प्रसिद्ध RCTI टीव्ही चॅनेलवर तब्बल ३५ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लहान मुलांचा आवडता कार्टून ‘डोरेमॉन’ अखेर बंद करण्यात आला आहे. १९९० च्या दशकापासून RCTI वर प्रसारित होणारा डोरेमॉन केवळ लहान मुलांचाच नव्हे, तर मोठ्यांच्याही आठवणींचा अविभाज्य भाग बनला होता.

RCTI वरून डोरेमॉन हटवण्यात आल्याची बातमी समजताच चाहत्यांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी डोरेमॉन सोबतच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत भावना व्यक्त केल्या. काही प्रेक्षकांनी या निर्णयाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, डोरेमॉन पूर्णपणे संपलेला नाही. जरी तो आता RCTI या टीव्ही वाहिनीवर दिसणार नसला, तरी आजही डोरेमॉन डिजिटल माध्यमे आणि विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 


५८ साल की उम्र में दूल्हा बनने को उतावले आशुतोष राणा

शंकर मराठे - मुंबई, ८ जनवरी २०२६ : एक्शन-कॉमेडी फिल्म 'वन टू चा चा चा' के धमाकेदार ट्रेलर में अभिनेता आशुतोष राणा दूल्हा बनने को बेताब नजर आए। एक्शन, कॉमेडी, गालियों का तड़का – ट्रेलर ने हंसाया और जोश भर दिया। यह फिल्म 16 जनवरी को थिएटर्स में धमाल करेगी


58 साल की उम्र में विलेन इमेज छोड़कर कॉमेडी अवतार में आशुतोष राणा। शादी को लेकर घबराहट, गुस्सा – एक्सप्रेशंस कमाल। ट्रेलर लॉन्च पर बोले, "पहली बार ऐसा अतरंगी किरदार निभाया है। यह फिल्म एक्शन-कॉमेडी मिक्स फैमिली के लिए परफेक्ट है।

Tuesday, January 6, 2026

देवीची आरती करताना अभिनेत्री सुधा चंद्रनच्या अंगात आलं



शंकर मराठे - मुंबई, ६ जानेवारी २०२६ : मनोरंजन विश्वातून एक आश्चर्यकारक आणि धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.  'नागिन', 'कहीं किसी रोज' यांसारख्या मालिका आणि अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. देवीची आरती आणि भजन सुरू असताना अचानक त्यांच्या 'अंगात आल्याचा' प्रकार घडला आहे. या व्हिडीओमध्ये त्या देवीच्या भक्तीत इतक्या तल्लीन झाल्या की त्यांना सांभाळणे देखील कठीण झाले होते.


नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, सुधा चंद्रन यांनी आपल्या घरी 'माता की चौकी' आयोजित केली होती. यावेळी देवीची आरती व भजन सुरू होते. अचानक भजनाच्या तालावर नाचता-नाचता सुधा चंद्रन यांना भक्तीचा संचार झाला. त्या जोरजोरात घुमू लागल्या आणि त्यांचे हावभाव पूर्णपणे बदलले. यावेळी उपस्थित लोकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्या कोणालाच जुमानत नव्हत्या. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्या चाहत्यांनी त्यांची बाजू घेतली आहे. "ही त्यांची देवी प्रती असलेली श्रद्धा आहे, याला ड्रामा म्हणू नका," असे म्हणत अनेकजण त्यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. भक्तीत तल्लीन होणे ही वैयक्तिक बाब असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

सुधा चंद्रन या हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील खूप मोठे नाव आहे. त्या स्वतः एक उत्तम नृत्यांगना आहेत आणि देवीच्या निस्सीम भक्त म्हणून ओळखल्या जातात. याआधीही त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर आपल्या भक्तीचे व्हिडीओ शेअर केले आहेत, पण यावेळचा व्हिडीओ मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.

पहली बार अक्षय कुमार - रानी मुखर्जी एकसाथ

शंकर मराठे - मुंबई, ६ जनवरी २०२६ : खिलाड़ी स्टार अक्षय कुमार की सुपरहिट फिल्म फ्रेंचाइज़ी ‘ओह माय गॉड’ के तीसरे भाग OMG 3 को लेकर भी चर्चाएं तेज़ हैं। बताया जा रहा है कि इस बार फिल्म में एक बड़ा सरप्राइज देखने को मिल सकता है। मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, OMG 3 में रानी मुखर्जी की एंट्री होने वाली है, जहां वह एक देवी के रूप में नजर आ सकती हैं। अगर ऐसा होता है, तो यह पहला मौका होगा जब अक्षय कुमार और रानी मुखर्जी बड़े पर्दे पर साथ दिखाई देंगे। हालांकि, इस खबर को लेकर मेकर्स की ओर से अभी तक कोई आधिकारिक घोषणा नहीं की गई है। इतना ही नहीं तो अक्षय कुमार का OMG 3 में किरदार सिर्फ कैमियो तक सीमित रहेगा। यही वजह है कि अक्षय कुमार की शूटिंग भी महज एक-दो दिनों की ही होगी।




Sunday, January 4, 2026

'दशावतार' सिनेमाची ऐतिहासिक भरारी

शंकर मराठे - मुंबई, ४ जानेवारी २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२५ हे वर्ष गाजवणारा आणि प्रेक्षकांची मने जिंकणारा 'दशावतार' हा चित्रपट आता जागतिक पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ९८ व्या अकादमी पुरस्कारांच्या म्हणजेच ऑस्कर २०२६ च्या 'मेन ओपन फिल्म' श्रेणीच्या कंटेंशन लिस्टमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे.

कोकणच्या मातीतील गोष्ट 'दशावतार' हा चित्रपट कोकणच्या समृद्ध लोककलेवर आणि संस्कृतीवर आधारित आहे.  'दशावतार'च्या या ऐतिहासिक भरारीमुळे सर्व स्तरांतून चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Saturday, January 3, 2026

श्रीलीला वैकुंठ एकादशी पर तिरुमाला तिरुपति श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर में

 


शंकर मराठे - मुंबई, ४ जनवरी २०२६ : २९ दिसंबर २०२५ को वैकुंठ एकादशी पर साउथ स्टार श्रीलीला तिरुमाला तिरुपति श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर पहुंचीं – मां और दादी संग लाइन में खड़ी होकर दर्शन किए, लेकिन फैंस ने घेर लिया, वीडियो वायरल हो गया। ट्रेडिशनल रेड साड़ी में श्रीलीला शरमाती नजर आईं, जबकि सिक्योरिटी भीड़ को कंट्रोल करने में जुट गई – पीछे खड़े भक्त हीरो बनने लगे, सेल्फी लेने की होड़ मच गई।


कितनी महंगी है खिचड़ी मलाइका की ?

शंकर मराठे - मुंबई, ३ जनवरी २०२६ : बॉलीवुड की आयटम गर्ल मलाइका अरोरा का रेस्टोरेंट एक आलीशान विंटेज बंगले में बना हुआ है। वैसे तो इसके मेन्यू ने हर किसी को जबरदस्त चौंका रखा है। 


खिचड़ी से लेकर पानी के बोतल की कीमत भी हद से ज्यादा है। साथ में, कई तरह के ड्रिंक्स भी हैं। मलाइका अरोरा ने अपने रेस्टोरेंट स्कारलेट हाउस में भारत का पहला हाइड्रेशन बार शुरू किया है। हाइड्रेशन बार में खास ड्रिंक्स और स्मूदीज मिलती हैं, जो थकान, कम रोग प्रतिरोधक क्षमता, स्किन की चमक फीकी पड़ना, रिकवरी और कई समस्याओं को दूर करने में मदद करती हैं।


खिचड़ी ५५० रुपए में है तो ३५० रुपये प्रति बोतल की एंटी-एजिंग इन्फ्यूज्ड वॉटर से लेकर उतनी ही कीमत पर हैंगओवर दूर करने वाले ड्रिंक तक, मेन्यू में कई ऑप्शन मौजूद हैं।

ये दाम देखते ही लोग हैरान रह गए और कमेंट सेक्शन में बहस छिड़ गई।

कुछ यूज़र्स बोले—

“ये खिचड़ी नहीं, सोने की दाल से बनी होगी!”

तो वहीं कुछ ने तर्क दिया कि

सेलेब रेस्टोरेंट्स में

आप खाना नहीं, एक्सपीरियंस और नाम के पैसे देते हैं।


Friday, January 2, 2026

लावणीचा 'डबल धमाका'

शंकर मराठे - मुंबई, २ जानेवारी २०२६ : मराठी सिनेमात दणकेबाज लावणीचे एक वेगळेच समीकरण आहे. आता हेच समीकरण एका नव्या आणि धमाकेदार जोडीसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लोकप्रिय नृत्यांगना हिंदवी पाटील आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडची या दोघी 'जब्राट' या आगामी मराठी सिनेमात एकत्र थिरकताना दिसणार आहेत. 'जब्राट' चित्रपटात या दोघींवर एक खास जुगलबंदीची लावणी चित्रित करण्यात आली आहे तर हा चित्रपट ६ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 



Thursday, January 1, 2026

किस को-स्टार का इंतजार कर रही है रेखा ?

शंकर मराठे - मुंबई, २ जनवरी २०२६ : बॉलीवुड के सुपरस्टार अमिताभ बच्चन और सदाबहार अभिनेत्री रेखा की लव स्टोरी के खूब किस्से हैं। दोनों ने आखिरी बार फिल्म 'सिलसिला' में काम किया था, जो साल 1981 में रिलीज हुई थी। इसके बाद दोनों फिल्मी पर्दे पर कभी साथ नजर नहीं आए। 


अभिनेत्री रेखा ने एक बार कहा है कि वो अमित जी की को-स्टार बनने का इंतजार कर रही हैं। सब्र का फल मीठा होता है। उन्हें यकीन है कि ये पक्का होगा।

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...