शंकर मराठे - मुंबई, १ नोव्हेंबर, २०२६ : ‘द एफस्टीन फाईल’ - भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात आवाज उठवणारा, सत्याचा शोध घेणारा आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट! महाराष्ट्रात २० नोव्हेंबरपासून प्रदर्शित होत आहे.
Saturday, October 31, 2026
भोंदूगिरी विरोधात आवाज उठवणारा सिनेमा ‘द एफस्टीन फाईल'
शंकर मराठे - मुंबई, १ नोव्हेंबर, २०२६ : ‘द एफस्टीन फाईल’ - भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात आवाज उठवणारा, सत्याचा शोध घेणारा आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट! महाराष्ट्रात २० नोव्हेंबरपासून प्रदर्शित होत आहे.
श्रद्धा कपूर का शानदार अवतार
शंकर मराठे - मुंबई, ३१ अक्टूबर, २०२६ : 'ईठा' फिल्म में श्रद्धा कपूर महाराष्ट्र की मशहूर लोक-कलाकार विठाबाई नारायणगांवकर के किरदार में नजर आएंगी। लावणी और तमाशा की दुनिया पर आधारित इस बायोपिक ड्रामा में उनका अंदाज बिल्कुल अलग और शानदार दिखाई दे रहा है। घुंघरू की झंकार, नाक में नथ और नौवारी साड़ी में श्रद्धा कपूर का देसी अंदाज जीत लेगा दिल!
श्रद्धा कपूरची ठसकेबाज लावणी
शंकर मराठे - मुंबई, ३१ ऑक्टोबर, २०२६ : गेले काही महिने सतत चर्चेत असलेल्या ईठा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ठसकेबाज लावणीसह तिच्या संवादांनीही सिने रसिकांचे लक्ष वेधले आहे.
Friday, October 30, 2026
श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज
शंकर मराठे - मुंबई, ३० ऑक्टोबर, २०२६ : सिनेमा ईठाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर ने धमाकेदार मराठमोळया स्टाइल मध्ये एंट्री घेतली व ह्या कार्यक्रमात श्रद्धा कपूर ने फुगडी देखील खेळली.
Shraddha Kapoor Arrives in Style for Eetha Trailer Launch
Shankar Marathe : Mumbai - 30 October 2026 : Bollywood Actress Shraddha Kapoor arrives in style for Eetha Trailer Launch.
Shraddha Kapoor looks absolutely breathtaking in a stunning Marathi avatar at the trailer launch of her upcoming film Eetha! Her traditional look is winning hearts, and we can’t get enough of this elegance.
Tuesday, October 27, 2026
नायिकांच्या फॅशन शोमध्ये अभिनेता सुबोध भावेची एन्ट्री
शंकर मराठे - मुंबई, २७ ऑक्टोबर, २०२६ : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये रंगणाऱ्या पोशाख फॅशन शोमध्ये आपल्या लाडक्या नायिकांसोबत समर राजवाडे अर्थात अभिनेता सुबोध भावे यांचीही खास एन्ट्री पाहायला मिळणार आहे. समरचा रुबाबदार अंदाज आणि त्याची खास शैली या फॅशन शोची रंगत आणखी वाढवणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत सुबोध भावे
शंकर मराठे - मुंबई, २७ ऑक्टोबर, २०२६ : महाराष्ट्र राज्यातील नाशिकचा भोंदू बाबा, अशोक खरात याचे प्रकरण उघड होताच संपूर्ण राज्याला धक्का बसला. या प्रकरणाच्या संबंधित अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाले. स्वत:मध्ये अद्भुत शक्ती असल्याचं भासवत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली. तसेच महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांसोबत अशोक खरातचे काही फोटो समोर आले होते. या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात आला. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या तुरुंगात आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेवर लवकरच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' असे चित्रपटाचे नाव असून, या सिनेमाच्या टीझरनेच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. दरम्यान, या सिनेमाचा तिसरा टीझर रिलीज झाला असून, या सिनेमात दिग्गज अभिनेते सुबोध भावे यांची भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'च्या तिसऱ्या टीझरची प्रचंड चर्चा होत आहे.
महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'च्या तिसऱ्या टिझरमध्ये सुबोध भावेंची झलक पाहायला मिळत आहे. या टिझरमध्ये सुबोध भावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत दिसत असल्याची माहिती आहे. या टिझरमध्ये सुबोध भावे यांचा एक डायलॉग ऐकायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांसमोर सुबोध भावे म्हणतात की, 'मंत्री असो किंवा आमदार असो. आमच्या पक्षाचा असो किंवा दुसऱ्या पक्षाचा असो. जो कुणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हा सर्वांना', असं सुबोध भावे म्हणताना दिसत आहे. या सिनेमाचा टिझर सोशल मीडियात व्हायरल होत असून, हा बहुप्रतिक्षित चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
Sunday, October 18, 2026
एकनाथ शिंदे ने टाइगर श्रॉफ से मुलाकात की
शंकर मराठे - मुंबई, १९ अक्टूबर, २०२६ : मुंबई के जुहू इलाके में रविवार शाम को अभिनेता टाइगर श्रॉफ की कार पर गोलीबारी की घटना हुई थी। इस घटना के बाद महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने देर रात टाइगर श्रॉफ से उनके घर जाकर मुलाकात की।
दसऱ्याच्या दिवशी मंदिरातील करोडोंचा मुकुट चोरीला जाणार?
शंकर मराठे - मुंबई, १९ ऑक्टोबर, २०२६ : झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘तारिणी’ मालिकेत सध्या एकापेक्षा एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकीकडे तारिणी आणि केदार सत्याच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे युवराजच्या वागण्यात वाढलेली चिडचिड आणि अस्वस्थता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर मालिकेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
कामत काकांची भेट घेतल्यानंतर युवराज प्रचंड अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या मनातील भीती आणि राग त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसत आहेत. रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण करण्यापर्यंत त्याचा राग पोहोचतो. त्यामुळे युवराज कोणत्या मोठ्या संकटात अडकला आहे आणि त्यामागे नेमकं कोण आहे, याची उत्सुकता वाढली आहे.
पद्मिनी काकू आणि तारिणी यांच्यातील वादाने वेगळंच वळण घेतलं आहे. पद्मिनी काकूंनी तारिणीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुमी वेळीच तिथे पोहोचल्याने परिस्थिती सावरली. ही घटना केदारला समजताच तो संतापतो आणि तारिणीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो.
दुसरीकडे, निशीच्या मागण्या आणि कामत काकांचं नाव ऐकताच युवराजचा संताप अनावर होतो. त्यामुळे त्याच्या मनात नेमकी कोणती भीती आहे, हा प्रश्न अधिकच गडद होत आहे.
आता मालिकेतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मंदिरातील मौल्यवान मुकुट चोरीला जाण्याचा कथित कट! या प्रकरणात युवराजचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तारिणी आणि केदारही सावध झाले असून, युवराजला रंगेहात पकडण्यासाठी ते काही खेळी करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पण इथेच खरी उत्सुकता आहे! तारिणी युवराजचा डाव उधळून लावणार की युवराज सगळ्यांच्या नजरेत धूळफेक करून मुकुट चोरी करण्यात यशस्वी होणार? आणि या सगळ्यामागचा खरा मास्टरमाइंड कोण असेल?
हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना आगामी भागाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Tuesday, October 13, 2026
मराठी रंगभूमीवर OTTच्या धाटणीचा प्रयोग; ‘ति ची गोष्ट’मधून उलगडणार स्त्रीमनाचे भावविश्व!
शंकर मराठे - मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२६ : डिजिटल माध्यमांमुळे कथाकथनाची बदललेली शैली आता रंगभूमीवरही अनुभवता येणार आहे. सुप्रसिद्ध लेखक आनंद म्हसवेकर यांच्या तीन स्वतंत्र कथांना एका सूत्रात गुंफत दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी ‘ति ची गोष्ट — Season 1’ हा अभिनव रंगमंचीय प्रयोग साकारला आहे. तीन कथा, वेगवेगळी पात्रे आणि निरनिराळ्या परिस्थितींतून स्त्रीच्या भावविश्वाचा वेध घेणाऱ्या या प्रयोगात मुंबई केवळ कथांची पार्श्वभूमी न राहता निवेदकाच्या भूमिकेतूनही प्रेक्षकांशी संवाद साधते.
OTTवरील मालिकांप्रमाणे एकाच सादरीकरणात वेगवेगळ्या कथांचा अनुभव देण्याची संकल्पना या प्रयोगातून मांडण्यात आली आहे. ‘पाण्यात पाहताना…’, ‘Female V/S Female’ आणि ‘Waiting Room’ या तीन कथांचा त्यात समावेश आहे. कथा आणि व्यक्तिरेखा बदलत असल्या, तरी स्त्रीच्या मनातील भावना, तिचे संघर्ष, इच्छा-आकांक्षा आणि न बोललेल्या गोष्टी हा तिन्ही कथांना जोडणारा समान धागा आहे.
*‘मी मुंबई बोलतेय...’ : मुंबईच बनते सूत्रधार*
मुंबईच्या वेगवान जीवनशैलीत, बदलत्या सामाजिक वास्तवात आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांत जगणाऱ्या स्त्रीच्या अनुभवांचे प्रतिबिंब या नाटकात उमटते. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या कणखर आवाजातील निवेदनातून ‘मी मुंबई बोलतेय...’ ही संकल्पना साकारते. मुंबईने पाहिलेली माणसे, अनुभवलेले प्रसंग आणि या महानगरात घडणाऱ्या जीवननाट्याची साक्ष या निवेदनातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.
स्त्रीकडे केवळ आई, पत्नी, मुलगी, बहीण किंवा प्रेयसी अशा नात्यांतून न पाहता स्वतंत्र विचार आणि भावविश्व असलेली व्यक्ती म्हणून पाहण्याचा प्रयत्न या प्रयोगातून करण्यात आला आहे. तिच्या मनातील द्वंद्व, अपेक्षा आणि न व्यक्त झालेल्या भावनांना रंगमंचावर स्थान मिळते. त्यामुळे प्रेक्षकांना कथांमधील व्यक्तिरेखांमध्ये स्वतःच्या अनुभवांचे प्रतिबिंब दिसते. विशेषतः महिला प्रेक्षकांकडून या प्रयोगाला भावनिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी सांगितले. ‘आमच्या मनातलं तुम्ही रंगमंचावर मांडलंत,’ अशा प्रतिक्रिया महिला प्रेक्षकांकडून मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*अनुभवी आणि नवोदित अभिनेत्रींचा सहभाग*
या प्रयोगात ‘भय्या हात-पाय पसरी’ या नाटकातील भूमिकेमुळे परिचित झालेल्या निर्मला कोटणीस, हिंदी-मराठी चित्रपट आणि नाटकांत काम केलेल्या स्मिता ओक व नीता दोंदे यांच्यासह कर्टन रेझर अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटरच्या विद्यार्थिनी शुचिका जोशी, उन्नती शिंदे आणि वेदिका वाळींबे या सहा अभिनेत्री विविध भूमिका साकारत आहेत. उषा नाडकर्णी यांच्या निवेदनामुळे कथांना एकत्र बांधणारा धागा अधिक ठळक होतो.
सुनील देवळेकर यांचे नेपथ्य व प्रकाशयोजना आणि संगीतकार कौशल इनामदार यांचे पार्श्वसंगीत या प्रयोगाला पूरक ठरते. बदलणाऱ्या कथांनुसार रंगमंचावर निर्माण होणारे वातावरण आणि संगीताच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावछटा हा सादरीकरणातील महत्त्वाचा भाग आहे.
*तीन कथांतून एकाच प्रश्नाचा शोध*
प्रचलित व्यावसायिक नाटकांच्या सादरीकरणापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत प्रशांत गिरकर आणि निर्माती नमिता गिरकर यांनी हा प्रयोग उभा केला आहे. स्वतंत्र कथांना एका संकल्पनेशी जोडून रंगमंचीय कथनाची नवी शक्यता तपासण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या तीन कथांमधून स्त्रीच्या आयुष्याकडे, तिच्या भावविश्वाकडे आणि समाजातील नातेसंबंधांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन समोर येतो. ‘ति ची गोष्ट — Season 1’ या प्रयोगातून मनोरंजनाबरोबरच स्त्रीच्या मनाचा आणि तिच्या न बोललेल्या भावनांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ज्यांनी ‘नटसम्राट’ केलं, ते सगळे हार्ट अटॅकने गेले
शंकर मराठे - मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२६ : अभिनेते नाना पाटेकर यांनी काही महिन्यांपूर्वी नागपुरात केलेलं हे विधान आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण या एका वाक्यामागे केवळ मृत्यूची भीती नव्हती, तर एका कलाकाराने भूमिकेत स्वतःला किती झोकून द्यावं लागतं, याची नानांनी सांगितलेली कथा होती. १८ मे २०२६ रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित ‘जलक्रांती परिषदेत’ नाना पाटेकर बोलत होते. नाना पाटेकरांनी आपल्या अभिनय प्रवासाचा संदर्भ देताना ‘नटसम्राट’चा विषय काढला. नाना म्हणाले की, त्यांना ‘नटसम्राट’ नाटक करण्यासाठी विचारण्यात आलं होतं; पण त्यांनी नाटक करण्याऐवजी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.
त्यामागचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं— “नाटक करत असताना प्रत्येकवेळी जीव त्यात ओतावा लागतो. मला वाटतं की १०, १५ किंवा २५ प्रयोगांनंतर मी मेलो असतो.” यानंतर नानांनी ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारलेल्या दिग्गज कलाकारांचा संदर्भ दिला. त्यांनी डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले आणि यशवंत दत्त यांची नावं घेतली आणि या भूमिकेची तीव्रता किती मोठी होती, हे सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ज्यांनी ज्यांनी ते नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकने गेले.”
मधुश्री - रॉबी बादल यांच्या ‘श्री रामचरितमानसचा' टीझर लाँच
शंकर मराठे - मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२६ : गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेली कालजयी कृती श्री रामचरितमानस आता ५२ तासांच्या भव्य संगीतमय सादरीकरणातून रसिकांसमोर येणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायिका मधुश्री यांच्या सुरेल आवाजात आणि संगीतकार रॉबी बादल यांच्या संगीताने सजलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा टीझर मुंबईत एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला. ही संगीतमय निर्मिती साकारण्यासाठी दोन्ही कलाकारांनी जवळपास दोन वर्षे समर्पित केली. हा टीझर रॉयंट म्युझिक (Royant Music) या म्युझिक लेबलअंतर्गत प्रदर्शित करण्यात आला आहे.
टीझर लाँच सोहळ्याला आध्यात्मिक गुरू ओमा द अक्क, निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेते करण राझदान, अभिनेता गगन मलिक, वास्तुतज्ज्ञ डॉ. खोजा, अभिनेत्री कंपल पटेल, पराग चापेकर आणि महिमा भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय आध्यात्मिक परंपरा आणि संगीत यांचा सुंदर संगम घडवणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Monday, October 12, 2026
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन
शंकर मराठे - मुंबई, १२ ऑक्टोबर, २०२६ : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन झालं. त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर लोककलेचा वारसा जपणाऱ्या समर्थ लावणी कलावंतही होत्या. चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. दीर्घ आजारातून त्यांचं निधन झाल्याची माहिती, सुनेनं दिली. गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. रंगमंचावर लावणी सादर करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून मधू कांबीकर यांनी आपल्या कलेची छाप पाडली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देण्यातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे.
Friday, October 9, 2026
अंतरंग : अभिनेते नाना पाटेकर
नाव - नाना पाटेकर (विश्वनाथ पाटेकर )
जन्म - 1 जानेवारी 1951, मुरुड-जंजिरा, रायगड, महाराष्ट्र
शिक्षण - सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई
पदार्पण चित्रपट - 'गमन' (1978)
दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा - 'प्रहार: द फायनल अटॅक' (1991)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 03 वेळा
- सर्वोत्कृष्ट अभिनेता 'क्रांतिवीर' (1995)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 'परिंदा' (1990)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 'अग्निसाक्षी' (1997)
2013 - पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा राज कपूर पुरस्कार
या पुरस्काराची 10 लाख रुपये महाराष्ट्रातील दुष्काळासाठी दान केली.
नटसम्राट - या चित्रपटासाठी राज्य फिल्मफेअर पुरस्कार
1999 च्या कारगिल युद्धात मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये मेजर म्हणून सेवा
मानद लेफ्टनंट कर्नल हा हुद्दा मिळाला
2015 - नाम Foundation ची स्थापना (सहसंस्थापक मकरंद अनासपुरे)
NAAM Foundation - दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण भागासाठी कार्य
निधन - 8 ऑक्टोबर 2026, गोवा
Thursday, October 8, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
शंकर मराठे - मुंबई, ८ ऑक्टोबर , २०२६ : आज सकाळी गोव्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. अनेक दशकं आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांची जीवनशैली मात्र अतिशय साधी होती. झगमगाटाच्या दुनियेत वावरूनही त्यांना शहरातील धावपळीपेक्षा गावाकडचं शांत आणि साधं आयुष्य अधिक आवडायचं. त्यामुळेच त्यांनी मुंबईऐवजी गावात राहणं पसंत केलं होतं.
नाना पाटेकर पुण्यातील खडकवासला परिसरातील त्यांच्या फार्महाऊसवर राहत होते. तब्बल २७ एकर परिसरात पसरलेल्या या फार्महाऊसवर ते शेतीही करायचे. त्यांच्या फार्महाऊसवर गायी आणि म्हशीदेखील होत्या. अभिनयाच्या क्षेत्रात मोठं नाव कमावल्यानंतरही त्यांनी स्वतःला या साध्या जीवनशैलीशी जोडून ठेवलं होतं.
नाना पाटेकर यांचा मुंबईशीही संबंध होता. अंधेरी परिसरात त्यांचा एक वन बीएचके फ्लॅट आहे. त्यांनी हा फ्लॅट नव्वदच्या दशकात खरेदी केल्याचं सांगितलं जातं. मात्र, मुंबईतील ग्लॅमर आणि प्रसिद्धीपेक्षा नाना पाटेकर यांना गावाकडचं शांत, साधं आणि निसर्गाच्या सान्निध्यातील आयुष्य अधिक जवळचं वाटत होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हाच साधेपणा त्यांच्या चाहत्यांना नेहमीच भावला.
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...



















