Monday, October 12, 2026

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन


शंकर मराठे - मुंबई, १२ ऑक्टोबर, २०२६ : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन झालं. त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर लोककलेचा वारसा जपणाऱ्या समर्थ लावणी कलावंतही होत्या. चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. दीर्घ आजारातून त्यांचं निधन झाल्याची माहिती, सुनेनं दिली. गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. रंगमंचावर लावणी सादर करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून मधू कांबीकर यांनी आपल्या कलेची छाप पाडली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देण्यातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...