Monday, August 24, 2026

नाही होणार तिसऱ्यांदा आई करीना कपूर


शंकर मराठे - मुंबई, २४ ऑगस्ट २०२६ : बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. जिममधून बाहेर पडतानाचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नन्सीबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

सोशल नेटवर्किंग साइटवर वायरल व्हिडिओत जिम आउटफिटमध्ये करीना कपूर गाडीकडे जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही सोशल मीडिया युजर्सनी ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या कमेंट्स केल्या. काहींनी तर आधीच शुभेच्छाही देण्यास सुरुवात केली.

मात्र, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं आता समोर आलं आहे. करीना कपूरच्या टीमने अभिनेत्री प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट केलं असून सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, केवळ एका व्हिडीओवरून अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अंदाज बांधला गेल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. टीमच्या स्पष्टीकरणानंतर मात्र करीनाच्या तिसऱ्या बाळाबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Sunday, August 23, 2026

आमिर खान निभाएंगे युवा क्रिकेटर का किरदार


शंकर मराठे - मुंबई, २३ अगस्त २०२६ : बॉलीवुड के मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान फिल्म ‘लालकारा’ में २५ साल के युवा क्रिकेटर का किरदार निभाने की तैयारी कर रहे हैं। ६१ साल की उम्र में यह भूमिका उनके लिए बड़ी चुनौती है।

खबर के मुताबिक, फिल्म की कहानी क्रिकेट पर आधारित है और इसे आशुतोष गोवारिकर के साथ आमिर की वापसी माना जा रहा है। किरदार में ढलने के लिए आमिर ने फिटनेस पर काम शुरू कर दिया है।

युवा क्रिकेटर जैसा दिखने के लिए आमिर अपना वजन घटा रहे हैं। साथ ही वह बॉडी लैंग्वेज और स्क्रीन अपीयरेंस पर मेहनत कर रहे हैं। उनका यह ट्रांसफॉर्मेशन फैंस के बीच चर्चा का विषय बन गया है।

आमिर खान अपनी फिल्मों में किरदार के लिए होने वाली मेहनत के लिए जाने जाते हैं। अब देखना होगा कि

६१ साल की उम्र में वह २५ साल के क्रिकेटर की भूमिका को कितनी शानदार ढंग से निभा पाते हैं।

Sunday, August 16, 2026

FDA ने शाहरुख खान, अजय देवगण व टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावली


शंकर मराठे - मुंबई, १६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र FDA ने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिरातीबाबत नोटीस बजावली आहे. या जाहिरातीमधून अप्रत्यक्षपणे विमल पान मसाल्याची जाहिरात होत असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रात पान मसाल्यावर बंदी असल्याने FDA ने ही कारवाई केली आहे.

या तिघांना जाहिरात थांबवण्यास, सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट आणि जाहिराती काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या नोटिसांना उत्तर देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Tuesday, August 11, 2026

दिग्गज कलाकारांच्या संवादांनी रंगला सॅन होजेचा मराठमोळा उत्सव


शंकर मराठे - मुंबई, ११ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ७ ते ९ ऑगस्टदरम्यान सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला अक्षरशः मराठी मनांच्या महासोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

हॉलिवूडच्या जगप्रसिद्ध नगरीत मराठी सिनेमाचा झेंडा फडकविणाऱ्या या महोत्सवात ५ मराठी चित्रपटांचे प्रीमिअर आणि ११ पुरस्कारप्राप्त शॉर्टफिल्म्सचे विशेष स्क्रीनिंग झाले. चित्रपटांबरोबरच महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांचे अनुभव, विचार आणि सिनेसृष्टीतील प्रवास ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. दिग्गज कलाकारांच्या मनमोकळ्या संवादांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

‘नाफा’ म्हणजे केवळ सिनेमा नव्हे, तर हा मराठी अस्मितेचा जागतिक सेतू!

नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले,

“नाफाचा हा तिसरा महोत्सव म्हणजे केवळ चित्रपटांचा उत्सव नाही, तर अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि आपल्या मातीशी जोडलेल्या भावनांचा जागतिक जागर आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला यंदा नवी ताकद मिळाली. अमेरिकेतील मराठी रसिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महाराष्ट्रातून आलेल्या कलावंतांचा सहभाग ही नाफाच्या प्रवासातील सर्वात मोठी ऊर्जा आहे. मराठी सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि नव्या पिढीला आपल्या भाषा-संस्कृतीशी जोडणे हेच नाफाचे पुढील ध्येय आहे.”

ते पुढे म्हणाले, “तीन दिवसांच्या महोत्सवात प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि समाधान हीच आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीची खरी पावती आहे. नाफा आता अमेरिकेतील मराठी समाजाचा उत्सव बनला आहे.”

रेड कार्पेटवर मराठी तारकांचा ‘ग्लोबल स्वॅग’!

महोत्सवाची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. रोहिणी हट्टंगडी, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे, अजिंक्य देव, प्रसाद ओक, गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, तृप्ती भोईर, सई देवधर, मंजिरी ओक आणि गार्गी कुलकर्णी यांच्या उपस्थितीने रेड कार्पेटवर मराठी कलाविश्वाचा ‘स्वॅग’ पाहायला मिळाला.

महाराष्ट्रीयन परंपरा, भारतीय संस्कृती आणि आधुनिक ग्लोबल स्टाईलचा सुरेख मिलाफ असलेल्या कलाकारांच्या उपस्थितीने California Theatre परिसरात मराठमोळ्या उत्साहाची लाट उसळली.

रोहिणी हट्टंगडींना ‘नाफा जीवन गौरव’


महोत्सवातील अत्यंत भावनिक क्षण ठरला तो ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘नाफा जीवन गौरव’ पुरस्काराचा.

हा सन्मान स्वीकारताना रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “मला अजून खूप काम करायचे आहे. जीवन गौरव मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारताबाहेर मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे.”

रोहिणी हट्टंगडी — “जीवन गौरव हा प्रवासाचा शेवट नाही; अजून खूप काम करायचे आहे!”

महेश कोठारे :


आठवणींपासून नव्या पिढीच्या स्वप्नांपर्यंत

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या अनुभवकथनाने रसिकांना मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळापासून आजच्या बदलत्या चित्रपटविश्वापर्यंतचा प्रवास अनुभवता आला.

महेश कोठारे — “मराठी सिनेमाची ताकद त्याच्या मातीशी जोडलेल्या कथांमध्ये आहे; ती ताकद जगापर्यंत पोहोचली पाहिजे.”

नागराज मंजुळे :


मातीतील कथा थेट जगाच्या मनात!

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या संवादाने वास्तववादी मराठी सिनेमाच्या ताकदीवर आणि सामान्य माणसाच्या कथांना मिळणाऱ्या जागतिक प्रतिसादावर विचारमंथन झाले.

नागराज मंजुळे — “आपल्या मातीतील आणि आपल्या माणसांच्या कथा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकतात.”

अजिंक्य देव : मराठी कलाकारांसाठी जग खुले!


अभिनेते अजिंक्य देव यांनी बदलत्या जागतिक माध्यमविश्वात मराठी कलाकारांसमोर निर्माण होणाऱ्या नव्या संधींवर संवाद साधला.

अजिंक्य देव — “आज मराठी कलाकारासाठी सीमा महाराष्ट्रापुरत्या राहिलेल्या नाहीत; जगाचे व्यासपीठ खुले आहे.”

प्रसाद ओक : परदेशातील प्रेक्षक म्हणजे मराठी सिनेमाची खरी ताकद!


अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या मनमोकळ्या संवादाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

प्रसाद ओक — “परदेशात राहूनही मराठी प्रेक्षक आपल्या सिनेमाशी इतक्या मनापासून जोडलेले आहेत, हीच मराठी कलाविश्वाची खरी ताकद आहे.”

गिरीजा ओक : कलाकार आणि रसिकांमधील अंतर मिटवणारे व्यासपीठ!


अभिनेत्री गिरीजा ओक यांनी अभिनय, महिला कलाकार आणि नव्या पिढीतील सर्जनशीलतेवर संवाद साधला.

गिरीजा ओक — “नाफासारख्या व्यासपीठामुळे जगभरातील मराठी प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील अंतर अक्षरशः मिटते.”

श्रुती मराठे : मराठी कथांना मिळतेय ग्लोबल विंडो!

अभिनेत्री श्रुती मराठे यांनी नव्या पिढीतील कलाकार आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचविण्याच्या संधींबाबत संवाद साधला.


श्रुती मराठे — “मराठी कथा आणि कलाकारांना जगभरातील प्रेक्षक मिळणे ही आजच्या पिढीसाठी मोठी आणि उत्साहवर्धक संधी आहे.”

पाच चित्रपट, अकरा शॉर्टफिल्म्स आणि हजारो चित्रपट प्रेमींच्या टाळ्यांचा नाद!

तीन दिवसांत सादर झालेल्या विविध आशयाच्या चित्रपट आणि लघुपटांना रसिकांनी मनापासून दाद दिली. विशेषतः ५ मराठी चित्रपटांचे प्रीमिअर आणि ११ पुरस्कारप्राप्त शॉर्टफिल्म्सचे स्क्रीनिंग हा महोत्सवाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरला.

चित्रपटांबरोबरच चर्चासत्रे, कलाकारांशी संवाद, मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी महोत्सवाची रंगत वाढवली. महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाल्याने अमेरिकेतील मराठी रसिकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांनी महोत्सवाला विशेष बळ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदाच्या महोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अमेरिकेच्या भूमीवर मराठी भाषा, कला, संस्कृती आणि चित्रपटांचा जागर घडविणाऱ्या या उपक्रमाचे त्यामुळे विशेष महत्त्व अधोरेखित झाले.

नव्या वर्षात अधिक उत्साहात आणि व्यापक स्वरूपात आयोजनाचे वचन देत ‘नाफा २०२६’ ची सांगता

तीन दिवसांच्या या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता ‘नाफा’ आता केवळ एक फिल्म फेस्टिव्हल राहिलेला नसून अमेरिकेतील मराठी समाजाचा सांस्कृतिक उत्सव आणि महाराष्ट्राला जगाशी जोडणारा प्रभावी सेतू बनला आहे.

California Theatreमध्ये उमटलेल्या टाळ्यांचा कडकडाट, कलाकारांभोवतीची गर्दी, चित्रपटांवरील चर्चा आणि रसिकांच्या चेहऱ्यावरील समाधान यामुळे तिसरा नाफा महोत्सव संस्मरणीय ठरला.

मराठी सिनेमा आता फक्त महाराष्ट्राचा नाही…

तो जगभरातील मराठी मनांचा अभिमान आहे!

Monday, August 10, 2026

सारा तेंडुलकरचा हटके ग्लॅमरस लूक


शंकर मराठे - मुंबई, १० ऑगस्ट २०२६ : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या तिच्या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सारा नेहमीच आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. मात्र यावेळी तिच्या पारंपरिक लूकमध्ये दिसलेला आधुनिक टच विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

साराने ऑफ-व्हाइट प्युअर सॅटिन सिल्क आणि ऑर्गेंजा सिल्कपासून तयार केलेला कॉर्सेट स्टाइल ब्लाऊज परिधान केला आहे. हा ब्लाऊज तिने पेस्टल ग्रीन कथ्थन सिल्क बनारसी हँडलूम साडीसोबत पेअर केला आहे. साडी आणि ब्लाऊजची डिझाइन Tilfi यांनी केली आहे.

लूक पूर्ण करण्यासाठी साराने डायमंडचं स्टेटमेंट नेकलेस आणि मॅचिंग कफ ब्रेसलेट घातलं आहे. या दागिन्यांमुळे तिच्या पारंपरिक साडी लूकला आणखी रॉयल अंदाज मिळाला आहे. मेकअपही साराने अतिशय साधा आणि एलिगंट ठेवला आहे.

माधुरी दीक्षित करणार ‘कोण होणार करोडपती’ चे सूत्रसंचालन


शंकर मराठे - मुंबई, १० ऑगस्ट २०२६ : सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ चे सूत्रसंचालन बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित करणार आहे, त्यामुळे आता खेळ बदलणार व नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात होणार आहे.



मुंबई के बारिश का आनंद उठाते हुए दिखी अभिनेत्री खुशी मुखर्जी

शंकर मराठे - मुंबई, १० अगस्त २०२६ : बॉलीवुड की दुनिया में कुछ भी संभव है और असंभव कुछ भी नहीं है। इसके तहत मुंबई की बारिश, लाल साड़ी में ल‍िपटी और ग्लैमरस ब्लाऊज के साथ फोटोग्राफर को अलग अलग पोज में फोटो देते हुए अभिनेत्री खुशी मुखर्जी दिखाई दी। इतना ही तो मुंबई के बारिश का आनंद उठाते हुए दिखाई दी। बारिश के बूंदों का रूमानी मजा लेते हुए अभिनेत्री खुशी मुखर्जी ने मुंबई की सड़कों पर अपना ग्लैमरस अंदाज दिखाया।









विवेक ओबेरॉय, डेज़ी शाह व उदित नारायण यांच्यासोबत मंच सामायिक करणारे वास्तु सल्लागार डॉ. खोजा


शंकर मराठे - मुंबई, १० ऑगस्ट २०२६ : वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. खोजा यांची ओळख आता केवळ भारतापुरती मर्यादित न राहता अनेक देशांमध्येही निर्माण होत आहे. विवेक ओबेरॉय, डेज़ी शाह, उदित नारायण, संगीता बिजलानी आणि राजीव ठाकूर यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत विविध कार्यक्रमांमध्ये मंच सामायिक केलेले डॉ. खोजा सध्या भारतासह परदेशातील ग्राहकांना वास्तु आणि ज्योतिष विषयक सल्ला देत आहेत.

गुजरातमधील वापी येथून मुंबईत आलेल्या डॉ. खोजा यांनी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील दीर्घकालीन अभ्यास, संशोधन आणि अनुभवाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अमेरिका, दुबई, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया आणि थायलंडसह अनेक देशांमधून त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी संपर्क साधला जातो.

डॉ. खोजा यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. ते दोन वेळा सुवर्णपदक विजेते ठरले असून त्यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंदविण्यात आले आहे. त्यांनी नाडी ज्योतिष, वैदिक ज्योतिष, लाल किताब, अंकशास्त्र, फेस रीडिंग, हस्तरेखा शास्त्र आणि वेस्टर्न अॅस्ट्रॉलॉजी यांसारख्या विविध विषयांचा सखोल अभ्यास केला आहे.

अलीकडेच डॉ. खोजा यांनी मलेशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला होता. या परिषदेत जगभरातील प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ, ज्योतिषी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासक सहभागी झाले होते. या व्यासपीठावर त्यांनी वास्तु आणि ज्योतिष क्षेत्रातील आपले अनुभव आणि निरीक्षणे मांडली.

डॉ. खोजा यांच्या मते, त्यांनी थायलंडसह अनेक देशांतील मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक समूहांना वास्तु सल्ला दिला आहे. भारतीय वास्तुशास्त्र आणि ज्योतिषाविषयी जागतिक स्तरावर वाढती उत्सुकता असल्याचे ते सांगतात.

आपल्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण अनुभव सांगताना डॉ. खोजा यांनी केनियातील नैरोबी येथे असलेल्या २० मजली कॉम्प्लेक्सचा उल्लेख केला. त्यांच्या मते, त्या ठिकाणी सतत नकारात्मक घटना आणि मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी त्या संकुलातील केवळ सुमारे ५ टक्के जागाच व्यापलेली होती.

डॉ. खोजा म्हणाले, “मी नैरोबीमध्ये जवळपास २५ दिवस राहून त्या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास केला. वास्तुशास्त्राशी संबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय आणि बदल सुचविण्यात आले. त्यानंतर तेथील परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून आले. आज ज्या कॉम्प्लेक्समध्ये केवळ ५ टक्के ऑक्युपन्सी होती, तेथे जवळपास संपूर्ण जागा भरलेली आहे.”

रेडिओ मिर्चीवरील त्यांच्या पॅन-इंडिया कार्यक्रमामुळेही डॉ. खोजा यांना मोठी लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाला देशभरातील सुमारे ४० दशलक्ष (४ कोटी) श्रोत्यांनी ऐकले होते. कार्यक्रमादरम्यान दररोज १०० हून अधिक फोन कॉल्स येत असत, ज्यामध्ये लोक वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक समस्यांबाबत मार्गदर्शन घेत असत.

याबाबत डॉ. खोजा म्हणाले, “रेडिओ मिर्चीमुळे मला देशभरातील लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळाली. दररोज मोठ्या संख्येने लोक त्यांच्या समस्या घेऊन फोन करत असत. लोकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे.”

डॉ. खोजा यांचे म्हणणे आहे की त्यांचे उद्दिष्ट केवळ भविष्य सांगणे नसून लोकांना सकारात्मक विचारसरणी आणि योग्य दिशा देणे हे देखील आहे. त्यांच्या मते, सकारात्मक विचार आणि चांगली कर्मे व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

भारत, अमेरिका, केनिया, मलेशिया, थायलंड, दुबई आणि इतर अनेक देशांमध्ये कार्यरत असलेले डॉ. खोजा आज वास्तुशास्त्र आणि ज्योतिष क्षेत्रातील एक ओळखले जाणारे नाव बनले आहेत. त्यांच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीमुळे त्यांची ओळख जागतिक स्तरावर अधिक मजबूत होत आहे.

Saturday, August 8, 2026

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव प्रदान!


शंकर मराठे - मुंबई, ८ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या दैदिप्यमान कलाप्रवासाबद्दल मानाचा ‘नाफा जीवन गौरव’ प्रदान करण्यात आला. नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या हस्ते हा सन्मान बहाल करण्यात आला. यावेळी नाफाच्या को-कन्व्हेनर अर्चना सराफ, रिया ठोसर, ज्येष्ठ सभासद श्री. ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


रोहिणी हट्टंगडी यांनी हा सन्मान आपल्या संपूर्ण कलाप्रवासाला आकार देणाऱ्या आई-वडिलांसह गुरु इब्राहिम अल्काझी, पती जयदेव हट्टंगडी, सहकलाकार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि निर्माते यांना समर्पित केला. त्या म्हणाल्या, “मला अजून खूप काम करायचे आहे. ‘जीवन गौरव’ मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारताबाहेर मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे.” नाफाने दिलेल्या सुंदर कार्यक्रमासाठी त्यांनी अभिजित घोलप आणि नाफाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.


‘नाफा’ म्हणजे केवळ चित्रपट महोत्सव नव्हे, सांस्कृतिक जागर!

अभिजित घोलप म्हणाले, “नाफा हा केवळ रुपेरी पडद्याशी जोडलेला चित्रपट महोत्सव नसून अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि परंपरेचा जागर घडविणारे सांस्कृतिक व्यासपीठ आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदापासून या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे. मराठी भाषा-संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या या प्रवासात युवा पिढीही हिरिरीने सहभागी होत आहे. यापूर्वीचा नाफा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते दिलीप प्रभावळकर व अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना देण्यात आला आहे. आज त्याच प्रभावळीतील रोहिणीताई हट्टंगडींचा सन्मान करण्याची संधी मिळणे हा नाफासाठी अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या सहवासाने नाफाचे व्यासपीठ अधिक समृद्ध होत आहे.”


रेड कार्पेटवर मराठी सेलिब्रिटींचा ‘स्वॅग’

रोहिणी हट्टंगडी, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, प्रसाद ओक, अजिंक्य देव, गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, नागराज मंजुळे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि निर्माती मंजिरी ओक व गार्गी कुलकर्णी यांच्या आकर्षक रेड कार्पेट एन्ट्रीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कलाकारांच्या पेहरावात महाराष्ट्रीयन परंपरा, भारतीय संस्कृती आणि आधुनिक ग्लोबल स्टाईलचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला. विशेष फोटोशूट आणि मीडिया लाऊंजमधील दिलखुलास संवादामुळे सोहळ्याची रंगत आणखी वाढली.


यानिमित्त प्रथेनुसार आदल्यादिवशी 'नाफा' संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या घरी 'गाला डिनर'चे आयोजन करण्यात आले होते. या 'गाला डिनर'मध्ये मराठी कलावंतांसह अमेरिकेतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. सॅन होजे येथील California Theatre मध्ये तीन दिवस रंगणाऱ्या 'नाफा महोत्सवा'च्या पुढील दोन दिवसांत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व मनोरंजक कार्यक्रमांसह अनेक चित्रपट आणि लघुपटांचे वर्ल्ड प्रीमिअर व विशेष स्क्रीनिंग होणार आहेत. हॉलिवूडच्या पंढरीत मराठी सिनेमाचा झेंडा आणि मराठी संस्कृतीचा जागर घडविणारा ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६’चा हा दिमाखदार सोहळा जागतिक मराठी समुदायासाठी निश्चितच अभिमानाचा ठरत आहे.

Monday, August 3, 2026

अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या 'Undocumented.PDF' लघुपटाचा कॅलिफोर्निया मध्ये प्रीमियर


शंकर मराठे - मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ : अमेरिकेत सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या यू.एस. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) अर्थात अमेरिकेतील स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी संस्था यांच्या अलीकडील कारवायांच्या पार्श्वभूमीवर "Undocumented.PDF" हा मराठी लघुपट इंग्लिश सबटायटल्स समवेत तयार करण्यात आला आहे. NAFA Films च्या बॅनरखाली या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून, कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे NAFA Film Festival 2026 मध्ये त्याचा येत्या ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० वाजता, प्रीमियर होणार आहे.

या लघुपटाची कथा कॅलिफोर्नियास्थित लेखिका अमृता हार्डीकर यांनी लिहिली असून, ह्यूस्टनस्थित हर्ष महाडेश्वर यांनी दिग्दर्शन केले आहे. अमेरिकेचे काँग्रेसमन श्री ठाणेदार आणि NAFAचे संस्थापक अध्यक्ष अभी घोलप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी नाफाच्या वतीने नाफाचे कार्यकारी समिती सदस्य भालचंद्र कुलकर्णी यांनी पार पाडली तर कॅलिफोर्नियातील अमोल थिटे आणि गोविंद उंकळकर हे या लघुपटाचे सहनिर्माते आहेत.

अमेरिकेतील स्थलांतर धोरणांबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये एकीकडे कठोर ICE कारवाईमुळे स्थलांतर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, बेकायदेशीर वास्तव्यास आळा आणि सार्वजनिक सुरक्षेला बळ मिळत असल्याचा दावा केला जातो. तर दुसरीकडे अशा कारवाईमुळे स्थलांतरित समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबे विभक्त झाली आहेत. तसेच, प्रलंबित इमिग्रेशन प्रक्रिया असलेल्या किंवा अनेक वर्षांपासून अमेरिकेशी घट्ट नाते असलेल्या व्यक्तींनाही त्याचा फटका बसल्याची टीका केली जात आहे.

यावेळी नाफा संस्थापक - अध्यक्ष तथा चित्रपटाचे निर्माते अभिजित (अभी) घोलप म्हणाले, "'Undocumented.PDF' हा केवळ स्थलांतराच्या प्रश्नावर आधारित चित्रपट नाही, तर ती प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाची, ओळखीची आणि आशेच्या संघर्षाची कथा आहे. आज जगभरात स्थलांतर हा केवळ राजकीय किंवा कायदेशीर विषय राहिलेला नसून तो लाखो कुटुंबांच्या भावविश्वाशी जोडलेला मानवी प्रश्न बनला आहे. या प्रश्नामागील मानवी वेदना, नातेसंबंध, स्वप्ने आणि वास्तव प्रेक्षकांसमोर संवेदनशीलपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नाफा फिल्म्सचे ध्येय केवळ मनोरंजन करणारे चित्रपट निर्माण करणे नाही, तर समाजाला विचार करायला लावणाऱ्या कथा सांगणे हे आहे. 'Undocumented.PDF' हा त्याच प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून, जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाशी भावनिक नाते जोडतील, असा मला विश्वास आहे."

आजच्या जागतिक स्थलांतराच्या प्रश्नावर भाष्य करणारा आणि मानवी मूल्यांचा वेध घेणारा "Undocumented.PDF" हा लघुपट सर्वाधिक चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरला असून, NAFA Film Festival 2026 मध्ये येत्या ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० वाजता, कॅलिफोर्निया मुख्य सभागृहात हा प्रीमियर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...