Tuesday, September 29, 2026
बापाच्या निधनानंतर १ कोटींसाठी ३ भावांमध्ये जुंपली अफरातफरी
शंकर मराठे - मुंबई, २९ सप्टेंबर २०२६ : बापाच्या निधनानंतर तब्बल १ कोटी रुपयांच्या मोहापायी नात्यांचे रंग कसे बदलतात आणि त्यातून कोणती धमाल उडते, याचा उत्तम नमुना म्हणजे आगामी अफरातफरी हा चित्रपट. जेव्हा ही १ कोटींची माया ३ सख्ख्या भावांच्या आयुष्याचा मुख्य केंद्रबिंदू बनते, तेव्हा घरात एकच गोंधळ उडणार, हे नक्कीच! याच उडणाऱ्या भन्नाट गोंधळाला अतिशय रंगतदार वळण देणारा, अफरातफरी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ कोटी रुपये या भावांना खरंच मिळणार की नाही ? आणि या भल्यामोठ्या रकमेसाठी हे ३ भाऊ एकमेकांविरुद्ध कोणकोणत्या रंजक खेळ्या खेळणार, याची प्रचंड उत्सुकता या ट्रेलरने निर्माण केली आहे. या धमाकेदार ट्रेलरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम या दिग्गज आणि कसलेल्या कलाकारांची तगडी फौज प्रेक्षकांना येत्या ९ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत.
फिल्म 'दृश्यम ३' के साथ पाव भाजी फ्री
शंकर मराठे - मुंबई, २९ सितंबर २०२६ : बॉलीवुड अभिनेता अजय देवगन की फिल्म 'दृश्यम ३' ('Drishyam: The Conclusion') के रिलीज के मौके पर, PVR INOX ने दर्शकों के लिए एक खास ऑफर के तहत फ्री पाव भाजी देने की घोषणा की है। इस ऑफर का लाभ उठाने के लिए दर्शकों को PVR INOX App या वेबसाइट के जरिए एक ही ट्रांजैक्शन में कम से कम 4 या उससे ज्यादा टिकट बुक करने होंगे। यह मुफ्त पाव भाजी का कूपन केवल पहले 500 पात्र ग्राहकों के लिए ही उपलब्ध है। यह ऑफर 2 अक्टूबर को मुंबई, दिल्ली-एनसीआर और गुरुग्राम के चुनिंदा PVR INOX सिनेमाघरों में ही मान्य होगा। मिला हुआ पाव भाजी कूपन सिर्फ 2 अक्टूबर के दिन को ही इस्तेमाल किया जा सकेगा।
बापूच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक
शंकर मराठे - मुंबई, २९ सप्टेंबर २०२६ : कोकणात हर्णै, मुरुड, आंजर्ले, मुर्डी या समुद्रकिनाऱ्यांपासून वर दापोलीपर्यंत पसरलेल्या याच त्रिकोणी प्रदेशात वसलंय एक गाव म्हणजे गारंबी. याच गारंबीत जन्माला येते एक गोष्ट, जी काळाच्या पडद्याआड जात नाही, उलट पिढ्यानपिढ्या तितकीच ताजी राहते ती म्हणजे "गारंबीचा बापू". मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार म्हणजे काशीनाथ घाणेकर. काशीनाथ घाणेकरांनी ज्या भूमिका अजरामर केल्या आहेत त्यातलीच एक भूमिका म्हणजे गारंबीचा बापू. श्री. ना. पेंडसे लिखित गारंबीचा बापू ही भूमिका काशीनाथ घाणेकर शब्दशः जगले आहेत. त्यांच्या नंतर चित्तरंजन कोल्हटकर यांनीही ही भूमिका नाटकात साकारली आहे. आता हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे मराठी अभिनेता प्रसाद ओक. गारंबीचा बापू हा चित्रपट नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दिग्दर्शक गुरूप्रसाद यांनी श्री. ना. पेंडसे यांच्या कोकण भूमीत रूजलेल्या कथेला आजच्या काळातील दृश्य भाषेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
Saturday, September 19, 2026
अभिनेत्री दीपिका पादुकोण के घर आई लक्ष्मी
शंकर मराठे - मुंबई, १९ सितंबर २०२६ : बॉलीवुड स्टार दीपिका पादुकोण और रणवीर सिंह ने फैंस को गुड न्यूज दी है. कपल फिर से पेरेंट्स बन गया है. दीपिका ने बेटी को जन्म दिया है. कपल ने खुद इस खुशखबरी को सोशल मीडिया पर पोस्ट शेयर करके फैंस को दी है.
दीपिका पादुकोण अपनी प्रेग्नेंसी को लेकर चर्चा में थीं. वो दूसरी मां बनने वाली थीं. ऐसे में अब एक्ट्रेस और रणवीर सिंह ने खुद फैंस को गुड न्यूज दी है. उनके घर पर एक बार फिर से किलकारी गूंज उठी है. दीपिका ने नन्ही परी को जन्म दिया है. बेटी दुआ के बाद कपल के घर फिर से लक्ष्मी आई है, जिसके बाद सोशल मीडिया पर बधाइयों का तांता लग गया है.
ऑस्करच्या दिशेने "गोंधळ" - नवविवाहितेच्या आयुष्यातील कथा
शंकर मराठे - मुंबई, १९ सप्टेंबर २०२६ : गोंधळ - महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने
रात्र गडद होत चालली आहे...गावातल्या एखाद्या जुन्या वाड्याच्या अंगणात दिव्यांची रोषणाई. आजूबाजूला जमलेली माणसं. कुठेतरी दूरवरून ढोलाचा आवाज कानावर येतो. मग टाळांचा नाद. मंत्रोच्चार. गाणं. नृत्य. आणि हळूहळू वाढत जाणारी त्या विधीची लय... ही केवळ पूजा नाही. ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीने शतकानुशतकं जपलेली एक जिवंत परंपरा आहे—गोंधळ!
आता याच गोंधळाचा नाद महाराष्ट्राच्या एखाद्या गावातून थेट जगाच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या चित्रपट सोहळ्याकडे निघाला आहे.
मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची २०२७च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी ही घोषणा केली. तब्बल ३३ चित्रपटांच्या यादीतून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी ही माहिती दिली.
एका मराठी चित्रपटासाठी ही नक्कीच महत्त्वाची घटना आहे. पण ‘गोंधळ’ची कथा ऐकताना त्याहूनही एक वेगळी गोष्ट जाणवते—महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा एक ठेका आता जागतिक पडद्यावर ऐकू येण्याची शक्यता आहे.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे आहे. कथा ग्रामीण महाराष्ट्रात घडते. ‘गोंधळ’ची कथा एका रात्रीची आहे.
नवविवाहित सुमन आणि आनंद यांच्या आयुष्यातील एका प्रसंगापासून घटनांची गुंतागुंत सुरू होते.सुमनची भूमिका इशिता देशमुख यांनी साकारली आहे. लग्न झालं आहे; पण लग्नाबरोबर आयुष्यातला आनंद होत नाही. उलट काही जुने हिशेब पुन्हा समोर येतात. कुटुंबातील दडलेले ताणतणाव आणि एक धोकादायक कट... या सगळ्यामुळे वातावरणात हळूहळू अस्वस्थता निर्माण होते.
आणि या सगळ्याच्या मध्यभागी आहे—गोंधळ. इथेच चित्रपटाची कल्पना वेगळी ठरते.
गोंधळाचा विधी केवळ पार्श्वभूमीवर चालू असलेला कार्यक्रम नाही. दिग्दर्शकाने त्याला कथानकाचा एक सक्रिय भाग बनवलं आहे. गाणं सुरू होतं, ढोल वाजतो, नृत्याची लय वाढते आणि त्याच वेळी पडद्यावरची कथा एका वेगळ्याच दिशेने सरकत जाते. जणू ढोलाचा प्रत्येक ठोका कथेतल्या एखाद्या गुपितावर पडतोय.
गोंधळाची रात्र पुढे सरकते आणि त्याचबरोबर व्यक्तिरेखांच्या मनातला ताणही वाढत जातो. बाहेर विधीचा गोंधळ आहे; आत प्रत्येकाच्या मनात वेगळाच गोंधळ!यामुळे ‘गोंधळ’ हा शब्द चित्रपटाच्या नावापुरता राहत नाही. तो कथेतल्या मानसिक आणि सामाजिक गुंतागुंतीचं रूपकही बनतो.
‘गोंधळ’ची कथा ग्रामीण महाराष्ट्राची आहे. पण तिच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. लग्न, कुटुंब, जुने संबंध, संशय, सत्तासंबंध, भीती आणि माणसांच्या मनात दडलेली रहस्यं—ही भाषा जगभरातील प्रेक्षकांना समजू शकते. आणि म्हणूनच कदाचित स्थानिक कथा जागतिक होण्याचा मार्ग इथे दिसतो.
‘गोंधळ’मध्ये किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू आणि सुरेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती डावखर फिल्म्सची आहे.
आता पुढचा टप्पा अमेरिकेत आहे. १४ मार्च २०२७. रविवार. ९९वा ऑस्कर सोहळा.
हॉलिवूडमध्ये त्या रात्री जगभरातील चित्रपटांची नावं पुकारली जातील. कॅमेरे चमकतील. रेड कार्पेटवर जगभरातील कलाकार दिसतील.
आणि कुठेतरी त्या प्रचंड झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या एखाद्या गावातील रात्रीचा आवाज आठवेल ढोलाचा ठेका...टाळांचा नाद...गाण्याची लय... आणि एका विधीतून उलगडणारी माणसांची कथा.
गोंधळ गावात सुरू झाला असेल; पण आता त्याचा प्रवास ऑस्करपर्यंत पोहोचला आहे.
कधी कधी... एका छोट्याशा गावातला ढोलाचा ठोका हॉलिवूडच्या झगमगाटापेक्षाही दूरवर ऐकू जातो.
Thursday, September 10, 2026
Shriya Saran @ Trailer Launch of Drishyam The Conclusion
Shankar Marathe - Mumbai, 10 September 2026 - Actress Shriya Saran at the Trailer Launch of Film Drishyam The Conclusion.
Wednesday, September 9, 2026
४ भाषाओं में फिल्म ‘तेरा साई’
शंकर मराठे - मुंबई, ९ सितंबर २०२६ : बॉलीवुड की दुनिया में अब फिल्म ‘तेरा साई’ के जरिए शिरडी के साई बाबा की कहानी बड़े पर्दे पर लाने की तैयारी है। फिल्म का नाम है ‘तेरा साई’ और इसमें अभिनेता संजय मिश्रा साई बाबा की भूमिका में नजर आएंगे। यह फिल्म अगले साल 5 फरवरी को सिनेमाघरों में रिलीज होगी। फिल्म हिंदी, मराठी, तेलुगु और तमिल इन चार भाषाओं में रिलीज होगी।
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...










