Tuesday, September 29, 2026
बापूच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक
शंकर मराठे - मुंबई, २९ सप्टेंबर २०२६ : कोकणात हर्णै, मुरुड, आंजर्ले, मुर्डी या समुद्रकिनाऱ्यांपासून वर दापोलीपर्यंत पसरलेल्या याच त्रिकोणी प्रदेशात वसलंय एक गाव म्हणजे गारंबी. याच गारंबीत जन्माला येते एक गोष्ट, जी काळाच्या पडद्याआड जात नाही, उलट पिढ्यानपिढ्या तितकीच ताजी राहते ती म्हणजे "गारंबीचा बापू". मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार म्हणजे काशीनाथ घाणेकर. काशीनाथ घाणेकरांनी ज्या भूमिका अजरामर केल्या आहेत त्यातलीच एक भूमिका म्हणजे गारंबीचा बापू. श्री. ना. पेंडसे लिखित गारंबीचा बापू ही भूमिका काशीनाथ घाणेकर शब्दशः जगले आहेत. त्यांच्या नंतर चित्तरंजन कोल्हटकर यांनीही ही भूमिका नाटकात साकारली आहे. आता हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे मराठी अभिनेता प्रसाद ओक. गारंबीचा बापू हा चित्रपट नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दिग्दर्शक गुरूप्रसाद यांनी श्री. ना. पेंडसे यांच्या कोकण भूमीत रूजलेल्या कथेला आजच्या काळातील दृश्य भाषेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment