Tuesday, September 29, 2026
बापाच्या निधनानंतर १ कोटींसाठी ३ भावांमध्ये जुंपली अफरातफरी
शंकर मराठे - मुंबई, २९ सप्टेंबर २०२६ : बापाच्या निधनानंतर तब्बल १ कोटी रुपयांच्या मोहापायी नात्यांचे रंग कसे बदलतात आणि त्यातून कोणती धमाल उडते, याचा उत्तम नमुना म्हणजे आगामी अफरातफरी हा चित्रपट. जेव्हा ही १ कोटींची माया ३ सख्ख्या भावांच्या आयुष्याचा मुख्य केंद्रबिंदू बनते, तेव्हा घरात एकच गोंधळ उडणार, हे नक्कीच! याच उडणाऱ्या भन्नाट गोंधळाला अतिशय रंगतदार वळण देणारा, अफरातफरी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ कोटी रुपये या भावांना खरंच मिळणार की नाही ? आणि या भल्यामोठ्या रकमेसाठी हे ३ भाऊ एकमेकांविरुद्ध कोणकोणत्या रंजक खेळ्या खेळणार, याची प्रचंड उत्सुकता या ट्रेलरने निर्माण केली आहे. या धमाकेदार ट्रेलरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम या दिग्गज आणि कसलेल्या कलाकारांची तगडी फौज प्रेक्षकांना येत्या ९ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment