शंकर मराठे - मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२६ : अभिनेते नाना पाटेकर यांनी काही महिन्यांपूर्वी नागपुरात केलेलं हे विधान आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण या एका वाक्यामागे केवळ मृत्यूची भीती नव्हती, तर एका कलाकाराने भूमिकेत स्वतःला किती झोकून द्यावं लागतं, याची नानांनी सांगितलेली कथा होती. १८ मे २०२६ रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित ‘जलक्रांती परिषदेत’ नाना पाटेकर बोलत होते. नाना पाटेकरांनी आपल्या अभिनय प्रवासाचा संदर्भ देताना ‘नटसम्राट’चा विषय काढला. नाना म्हणाले की, त्यांना ‘नटसम्राट’ नाटक करण्यासाठी विचारण्यात आलं होतं; पण त्यांनी नाटक करण्याऐवजी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.
त्यामागचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं— “नाटक करत असताना प्रत्येकवेळी जीव त्यात ओतावा लागतो. मला वाटतं की १०, १५ किंवा २५ प्रयोगांनंतर मी मेलो असतो.” यानंतर नानांनी ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारलेल्या दिग्गज कलाकारांचा संदर्भ दिला. त्यांनी डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले आणि यशवंत दत्त यांची नावं घेतली आणि या भूमिकेची तीव्रता किती मोठी होती, हे सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ज्यांनी ज्यांनी ते नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकने गेले.”

No comments:
Post a Comment