Tuesday, October 27, 2026

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत सुबोध भावे


शंकर मराठे - मुंबई, २७ ऑक्टोबर, २०२६ : महाराष्ट्र राज्यातील नाशिकचा भोंदू बाबा, अशोक खरात याचे प्रकरण उघड होताच संपूर्ण राज्याला धक्का बसला. या प्रकरणाच्या संबंधित अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाले.  स्वत:मध्ये अद्भुत शक्ती असल्याचं भासवत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले.  लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली. तसेच महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांसोबत अशोक खरातचे काही फोटो समोर आले होते. या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात आला. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या तुरुंगात आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेवर लवकरच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' असे चित्रपटाचे नाव असून, या सिनेमाच्या टीझरनेच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. दरम्यान, या सिनेमाचा तिसरा टीझर रिलीज झाला असून, या सिनेमात दिग्गज अभिनेते सुबोध भावे यांची भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'च्या तिसऱ्या टीझरची प्रचंड चर्चा होत आहे.

महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'च्या तिसऱ्या टिझरमध्ये सुबोध भावेंची झलक पाहायला मिळत आहे. या टिझरमध्ये सुबोध भावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत दिसत असल्याची माहिती आहे. या टिझरमध्ये सुबोध भावे यांचा एक डायलॉग ऐकायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांसमोर सुबोध भावे म्हणतात की, 'मंत्री असो किंवा आमदार असो. आमच्या पक्षाचा असो किंवा दुसऱ्या पक्षाचा असो. जो कुणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हा सर्वांना', असं सुबोध भावे म्हणताना दिसत आहे. या सिनेमाचा टिझर सोशल मीडियात व्हायरल होत असून,   हा बहुप्रतिक्षित चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...