शंकर मराठे - मुंबई, ८ जानेवारी २०२६ : इंडोनेशियातील प्रसिद्ध RCTI टीव्ही चॅनेलवर तब्बल ३५ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लहान मुलांचा आवडता कार्टून ‘डोरेमॉन’ अखेर बंद करण्यात आला आहे. १९९० च्या दशकापासून RCTI वर प्रसारित होणारा डोरेमॉन केवळ लहान मुलांचाच नव्हे, तर मोठ्यांच्याही आठवणींचा अविभाज्य भाग बनला होता.
RCTI वरून डोरेमॉन हटवण्यात आल्याची बातमी समजताच चाहत्यांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी डोरेमॉन सोबतच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत भावना व्यक्त केल्या. काही प्रेक्षकांनी या निर्णयाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, डोरेमॉन पूर्णपणे संपलेला नाही. जरी तो आता RCTI या टीव्ही वाहिनीवर दिसणार नसला, तरी आजही डोरेमॉन डिजिटल माध्यमे आणि विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

No comments:
Post a Comment