शंकर मराठे - मुंबई, २१ जानेवारी २०२६ : झी मराठीवरील 'देवमाणूस: मधला अध्याय' ही लोकप्रिय मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत किरण गायकवाडने रंगवलेल्या 'गोपाळ'च्या पात्राला तोंडीस तोंड देणारी व्यक्ती म्हणून 'लाली' समोर आली आहे. सुरुवातीला एक निरागस आणि साधी मुलगी म्हणून कथेत आलेली लाली आता एकापाठोपाठ एक खून करताना दिसत आहे.
देवमाणूस मधील कथेत जेव्हा गोपाळ आणि लाली यांच्यामध्ये तिसरी व्यक्ती आली, तेव्हापासून लालीचे पात्र बदलत गेले. आपल्या प्रेमासाठी आणि अस्तित्वासाठी तिने हिंसक मार्ग पत्करला आहे.
या धक्कादायक वळणाबद्दल लाली म्हणजेच अभिनेत्री सोनम म्हसवेकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
लाली म्हणजेच सोनमच्या मते, लाली या पात्राचा आलेख इतका उंचावेल याची तिला सुरुवातीला कल्पना नव्हती. मात्र, आता प्रेक्षकांकडून तिला मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. प्रेक्षक मला म्हणतात की लाली तू फ्लॉवर नाही, तर फायर आहेस! विशेष म्हणजे, मी मालिकेत खून करत असूनही प्रेक्षकांना माझा राग येण्याऐवजी माझ्याबद्दल सहानुभूती वाटते. ही माझ्या अभिनयाची पावती आहे असे मला वाटते


No comments:
Post a Comment