Thursday, January 22, 2026

'देवमाणूस' मालिकेतून 'आर्या'चा प्रवास संपला

शंकर मराठे - मुंबई, २२ जानेवारी  २०२६ : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट आणि गोपाळ टेलरचा थरार प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवतो. आता या मालिकेतून एका महत्त्वाच्या पात्राने कायमची रजा घेतली आहे. 'देवमाणूस' मध्ये 'आर्या' ही भूमिका साकारणारी अभिनेत्रीचा हया मालिकेतील प्रवास संपला आहे.

अभिनेत्रीने सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या शेवटच्या सीनचे आणि शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने अतिशय सूचक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, "The end of the beginning". तिच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, तिने या मालिकेचा निरोप घेतला आहे.


No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...