शंकर मराठे - मुंबई, ३१ जानेवारी २०२६ : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या व बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणाऱ्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मात्यांनी आज 'द केरळ स्टोरी 2' चे पहिले मोशन पोस्टर रिलीज केले असून, ते पाहून सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या चित्रपटाचे मोशन पोस्टर अत्यंत वेदनादायी आणि अंगावर काटा आणणारे आहे. पोस्टरमध्ये काही मुलींचे रडणारे आणि भीतीने ग्रासलेले चेहरे दिसत आहेत. या मुलींचे डोळे खूप काही सांगून जात आहेत. पोस्टरसोबत "काही गोष्टी कधीच संपत नाहीत..." असा संदेश देण्यात आला आहे, जो चित्रपटाच्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधतो. हा सिनेमा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता 'द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड' काय नवीन वादळ निर्माण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

No comments:
Post a Comment