शंकर मराठे - मुंबई, ११ जानेवारी २०२६ : गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत अभिनेत्री इला भाटे हया दमदार भूमिकेत बघायला मिळाल्या. खरं तर त्यांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं पण कमी गुण मिळाल्याने त्यांनी डिएमएलटी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईत राहून स्वतःची लॅब चालवली.
अभिनेत्री इला भाटे यांचे पती उदय भाटे हे डॉक्टर आहेत. मित्राची बहीण म्हणून इला यांना ते बायोलॉजी शिकवायला घरी येत होते. दोघांकडे लक्ष राहावं म्हणून शेजारी राहणाऱ्या इलाच्या मावशी सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असायच्या. पण बायोलॉजी शिकवता शिकवता दोघांचे प्रेमाचे सूर जुळले आणि घरच्यांनाही त्याचा सुगावा लागला. वय कमी असल्यामुळे घरच्यांनी लग्नाला थोडासा विरोध दर्शवला. पण दोघांचा समजूतदारपणा पाहून शिक्षण होताच साखरपुडा करून दिला आणि त्यानंतर मोठ्या थाटात त्यांनी लग्नही केलं.
सध्या झी मराठीवर रात्री ९ वाजता प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका कमळी मध्ये कमळीच्या अन्नपूर्णा आजीची भूमिका अभिनेत्री इला भाटे साकारत आहे.
हया लवस्टोरी बद्दल एका लाइन मध्ये सांगता येईल की - "बायोलॉजी शिकवता शिकवता, आयुष्याची केमिस्ट्री जुळली...."

No comments:
Post a Comment