शंकर मराठे - मुंबई, ४ जानेवारी २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२५ हे वर्ष गाजवणारा आणि प्रेक्षकांची मने जिंकणारा 'दशावतार' हा चित्रपट आता जागतिक पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ९८ व्या अकादमी पुरस्कारांच्या म्हणजेच ऑस्कर २०२६ च्या 'मेन ओपन फिल्म' श्रेणीच्या कंटेंशन लिस्टमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे.
कोकणच्या मातीतील गोष्ट 'दशावतार' हा चित्रपट कोकणच्या समृद्ध लोककलेवर आणि संस्कृतीवर आधारित आहे. 'दशावतार'च्या या ऐतिहासिक भरारीमुळे सर्व स्तरांतून चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment