Wednesday, April 15, 2026
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली व त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच आज "देऊळ बंद २" चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि आनंदात अजूनच भर पडली. "देऊळ बंद" मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या सशक्त अभिनयाने आणि आवाजाने स्वामी समर्थ अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभे राहून आपल्याशी संवाद साधत आहेत असे प्रेक्षकांना वाटत होते. तेच सर्वांना "देऊळ बंद २" मध्ये अनुभवायला मिळणार आहे, कारण या भागात सुद्धा मोहन जोशी हेच श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे त्यांच्या सोबत असणार आहेत.
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित "देऊळ बंद २ - आता परीक्षा देवाची" च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेने हात उंचावत स्वामी दुचाकीवर मागे बसले असून अभिनेत्री स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहेत. स्वामी जरी प्रसन्न मुद्रेत असले तरी स्नेहल यांच्या चेहऱ्यावर राग आहे आणि डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत, आता हा राग कशासाठी आणि दुःख कशाचे? यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची वाट पाहायला लागणार आहे. 'भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात', हाच संदेश या पोस्टरमधून अधोरेखित होत आहे. पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चारचाकीतून प्रवास केला तर "देऊळ बंद २" मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात स्वामीकृपेने एका सामान्य कुटुंबाची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार असे दिसत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...


No comments:
Post a Comment