शंकर मराठे - मुंबई, १९ मार्च २०२६ : महाराष्ट्राच्या लोककलेचा महत्त्वाचा भाग म्हणजे देवीचा जागर करणारी गोंधळी मंडळी. त्यांच्या भक्तीतून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आगामी १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'सालबर्डी' या सिनेमात गश्मीर महाजनी एका प्रभावी गोंधळ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या नृत्यामध्ये त्याने केलेली अस्सल पारंपरिक वेशभूषा आणि प्रभावी देहबोली खरोखरच पाहण्यासारखी आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे कथानकातील गूढ आणि उत्सुकता अधिक वाढवणारे ठरणार आहे.
‘काळरातीचा जोर वाढला घोर, होई शिरजोर गं जगदंबे’ ।
अंधार मातला थोर, असा घनघोर, लागला घोर गं जगदंबे ।
गावातील एका भयानक आणि गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठीच हा गोंधळी गावात येतो का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या विशेष भूमिकेविषयी बोलताना गश्मीर महाजनी म्हणतो, "गोंधळ ही केवळ परंपरा नसून, ती देवीभक्तीची एक ऊर्जा देणारी अभिव्यक्ती आहे. 'सालबर्डी' मधील माझी गोंधळी ही व्यक्तिरेखा कथेला एक महत्त्वाचे वळण देते.

No comments:
Post a Comment