शंकर मराठे - मुंबई, २९ नोव्हेंबर २०२५ : 2027 साली नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात जाऊन वृक्षाची पाहणी करत एकही वृक्ष तोडू देणार नाही, असा इशारा दिला.
सयाजी शिंदे म्हणाले की, झाडं ही आमची आईबाप आहेत. त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजूत घेतली पाहिजे. तपोवनात काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहेत. त्यामुळे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन, लढा उभा राहिलाय, त्याला माझा पाठिंबा आहे. साधू आले, गेले तरी त्याने काही फरक पडत नाही. याविषयी माझा अभ्यास नाही. पण झाडं गेली तर फार मोठं नुकसान होईल. इथलं एकही झाड तुटता कामा नये. ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसांनी आपल्याला फसवलं तर त्यांना आपलं कसं म्हणायचं, शासन आपलं आहे की, इंग्रजांचं राज्य आहे? आपल्याला झाडांची वयाची व्याख्याच माहिती नाही, तशी व्याख्या करणं राज्य सरकारला जमलेले नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे. हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडलाय. ही मोठी झाडं जास्त ऑक्सिजन देणारी असतात, त्यांची मोठी पानं जास्त कार्बन घेतात, ऑक्सिजन देतात. वडाच्या झाडावर पाचशे सहाशे प्रजाती जगतात. अशी झाडं तोडली तर त्याला माफी नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...


No comments:
Post a Comment