शंकर मराठे - मुंबई, २९ नोव्हेंबर २०२५ : बीएमसी आणि ट्री अथॉरिटी, मुंबई यांनी जपानच्या कॉन्सुलेट-जनरलच्या सहकार्याने भायखळा येथील जिजामाता उद्यान मध्ये बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शनी आयोजित केली असून ३० नोव्हेंबर, रविवारपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ अशी आहे.
हया प्रदर्शनात ३०० हून अधिक प्रकारच्या बोन्साय झाडांचे पहावयास मिळणार असून, भारतीय आणि जपानी कलाकारांनी बनवलेल्या उत्कृष्ट ओरिगामी कलाकृतींचाही समावेश आहे. या उपक्रमाला इंडो-जपानी असोसिएशनच्या बोन्साय स्टडी ग्रुप आणि ओरिगामी मित्र यांचे सहकार्य लाभले आहे. बोन्साय ही लहान कुंडीत वाढणारी सुंदर रोपे असून ती घरी ठेवणे सहज शक्य आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला देखील फायदा होतो.
मुंबई महानगर पालिका गेल्या २७ वर्षांपासून वनस्पती आणि फुलांच्या प्रदर्शनीचे आयोजन करत आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी २०२६ मध्ये होणारी वार्षिक फुलांची प्रदर्शनीही मुंबईकरांसाठी मोठे आकर्षण असते.
भारत आणि जपानच्या कला, संस्कृती व पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा संगम असलेले हे अनोखे प्रदर्शन पाहणे, अनुभव घेणे व शिकण्यासारखे आहे.



No comments:
Post a Comment