Sunday, April 5, 2026

वाघ्या-मुरळीच्या प्रथेतील एका स्त्रीचा संघर्षमय प्रवास 'फुला'


शंकर मराठे - मुंबई, ५ एप्रिल २०२६ : महाराष्ट्राची संपन्न लोकपरंपरा आणि वाघ्या-मुरळीच्या प्रथेतील एका स्त्रीचा अत्यंत कठीण आणि संघर्षमय प्रवास 'फुला' या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. येत्या १७ एप्रिल रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका मुरळीच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि बालवयातच खंडोबाशी लग्न लावून दिलेल्या एका निरागस मुलीची ही अत्यंत भावनिक कथा आहे. समाजात तिला अत्यंत वाईट आणि निंदनीय शब्दांत हिणवले जाते, तरीही संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली तिचे नाकारले जाणारे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तिने दिलेला हा लढा चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

एका बाजूला संपूर्ण जगात प्रगत एआय तंत्रज्ञानाचा विस्तार वेगाने होत असताना, दुसरीकडे आपल्या समाजावर आजही असलेल्या जुन्या रूढी आणि परंपरांचा खोल पगडा या चित्रपटातून अत्यंत प्रभावीपणे आणि विरोधाभासात्मक पद्धतीने मांडण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...