Monday, November 10, 2025

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव “ वेव्ज फिल्म बाजार, विविंग रूम/ वर्क इन प्रोग्रेस - 2025”

 

शंकर मराठे - मुंबई, १० नोव्हेंबर २०२५ : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव “ वेव्ज  फिल्म बाजार, विविंग रूम/ वर्क इन प्रोग्रेस - 2025” साठी अ. भा. म. चित्रपट निर्माता महामंडळ मार्फत

1) सासुबाईचा साखरपुडा 

2) खुळ्यांची जत्रा 

3) अंत एक प्रारंभ 

4) आजी 

5) भुरळ डोळ्यांची 

6) सॉईल ॲण्ड साऊल (हिंदी)

7) डॉ. हेडगेवार (हिंदी)* 

या सात मराठी- हिंदी चित्रपटांची निवड.

नोव्हेंबर 2025 गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील “वेव्ज फिल्म बाजार” विभागासाठी "विविंग रूम / वर्क इन प्रोग्रेस" निर्माता महामंडळ वतीने चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात आले आहेत.

2025 या वर्षांपासून मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळावे आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळावा  या उद्देशाने कोरीयन फिल्म महोत्सव फ‍िल्म बाजार व गोवा आंतरराष्ट्रीय च‍ित्रपट महोत्सव फ‍िल्म बाजारात सहभाग घेतला जात आहे. 

निवड झालेल्या चित्रपटांचे फिल्म बाजारमध्ये  स्क्रिनिंग करण्यात येते. तसेच महोत्सव कालावधीपर्यंत निवडक चित्रपट रसिकांना पूर्व नाव नोंद करून चित्रपट पाहण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येते.

अनेक देशातील अनेक चित्रपट वितरक, समिक्षक चित्रपट पाहतात किंवा चित्रपटास अर्थसहाय्य करतात तसेच आपापल्या देशात चित्रपट रिलीज करण्यासाठी ठराविक कालावधी करीता खरेदी करतात.

आजपर्यंत कोणत्याही संघटनेने निर्माता यांच्या करीता अशाप्रकारच्या योजना आंमलात आणल्या नाहीत. निर्माता महामंडळ अध्यक्ष देवेंद्र मोरे, मानद अध्यक्ष ॲड. मोहनराव पिंपळे यांच्या सहभागातून आम्ही चित्रपटांना नवे दालन दाखविण्यासाठी सज्ज झालो आहोत. लवकरच हॉंगकॉंग फिल्म बाजार मध्ये आम्ही चित्रपट घेऊन जाणार आहोत.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...