शंकर मराठे - मुंबई, २५ नोव्हेंबर २०२५ : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्या येथील आवंढे या गावात बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांचं हे फार्म हाऊस दिमाखात सजलेलं पाहायला मिळतं. त्यांच्या या फार्म हाऊसजवळच एक छोटासा तलाव आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर झाडी आहेत. बॉलिवूड चित्रपटात जशी आलिशान घरं दाखवली जातात अगदी तसंच त्यांचं हे फार्म हाऊस त्यांनी सजवलं आहे.
सर्व सुख सोयींनीयुक्त असं घर, स्विमिंगपूल, फाउंटन , फुलझाडं एवढंच नाही तर गाईंसाठी गोठा असं सगळं या फार्म हाऊसमध्ये पाहायला मिळतं.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाला, फळांचा ते आस्वाद घेतात. बऱ्याचदा धर्मेंद्र यांचा मुलगा सनीनेही इथे आवर्जून हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. तिथल्या कामगारांसोबतही धर्मेंद्र यांचे सलोख्याचे नातं तयार झालं आहे.
पण काल २४ नोव्हेंबर २०२५ रोजी आपला बॉलीवूड इंड्रस्टी मधील हीमैन हिरो धर्मेंद्र ह्या जगाला रामराम ठोकून गेला. पण त्याच्या आठवणी आजही ह्या आलिशान फार्म हाऊस मध्ये घर करून आहेत.





No comments:
Post a Comment