शंकर मराठे - मुंबई, ९ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकरांच्या घरी लगीन घाई सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आदेश बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकरच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. सोहम बांदेकर 'याड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारीला डेट करत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती.दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे भाष्य केलं नव्हतं. पण दोघांच्या वागण्यातून आणि बोलण्यात या चर्चांना दुजोरा मिळत गेला.अभिनेत्री आणि सोहमची आई सुचित्रा बांदेकर यांनीही एका मुलाखतीत मुलाच्या लग्नाची उत्सुकता बोलून दाखवली होती. लेकाच्या लग्नात लाखांचा पैठणी घालून मिरवणार असंही त्या म्हणाल्या होत्या.अखेर सोहम बांदेकर लग्न करतोय आणि त्याच्या केळवणाला सुरूवात झाली आहे. नुकतंच त्याचं पहिलं केळवण पार पडलं असून केळवणाचे फोटो समोर आलेत. आस्वाद उपहारगृहात सोहमचं केळवण पार पडलं. त्याच्या लाडक्या मावश्यांनी त्याचं केळवण केलं.अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सोहमसाठी खास पोस्ट लिहिली आहे. आस्वादच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अभिनेत्री सुकन्या मोने,पूर्वा गोखले, शिल्पा नवलकर आणि अभिजीत केळकर यांनी सोहमचं केळवण केलं. सोहमला मुंडावळ्या बांधून त्याचं छान औक्षण केलं. त्याला प्रेमाची भेटवस्तू दिली.
Sunday, November 9, 2025
आदेश बांदेकरांच्या घरी लगीन घाई सुरू

Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment