Friday, December 26, 2025

स्ट्रगल अभिनेत्री शिवाली परबचा


शंकर मराठे - मुंबई, २६ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या टीव्ही शो द्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री शिवाली परबचा सुरुवातीच्या काळातील स्ट्रगल जाणून घेऊ या....

अभिनेत्री शिवाली परब ने आपल्या स्ट्रगल बद्दल सांगितले की मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा काही कारणांमुळे ड्रॉप लागला त्यामुळे ६ महिने काय करू, मला काही सूचतच नव्हतं की काय करू. कारण त्यांच्या आधी जी मला जॉब ऑफर आली होती ती मी पप्पांना म्हटले की मला नाही करायचं आहे, कारण मला अभिनय करायचा होता. मला ड्रॉप लागला व हे सर्व काही बंद झाले. त्यामुळे माझ्याकडे ते ६ महीने काहीचं काम येत नव्हते. नाही माझे एकांकिका ना नाटक. काहीही नव्हते. सो, मी बाहेर प्रयत्न करत होते की मला काम मिळेल का ? मी ६ सहीने घरात बसून काढली व मला इतकं टेंशन आले होते की मी काय करायचे ? माझं सगळं करियर संपलंय. कोणत्याही ग्रुपची कनेक्टीविटीच राहीली नाही. मला खूप टेंशन आले, मी ठरवले की आपण पुन्हा कॉलेज ज्वाइन करायचं, पुन्हा कॉलेजला जायचं. नव्याने काही तरी करियर चूज करून नव्याने सुरूवात करायची, पण पुन्हा तेच की जे होतं चांगल्यासाठीच होते आणि पुढे माझी अभिनयाची गाडी सुरू झाली.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...