Friday, February 13, 2026

९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणाने विनोदी अभिनेता राजपाल यादव तुरुंगात

शंकर मराठे - मुंबई, १३ फेब्रुवारी २०२६  :बॉलीवूडमधील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आर्थिक व्यवहारातील मोठ्या वादामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली असून या प्रकरणाने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

तुरुंगात जाण्याचे प्रकरण असं आहे की वर्ष 2010 मध्ये त्यांनी ‘अता पता लपता’ या चित्रपटासाठी मोठं कर्ज घेतलं होतं. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर कर्जाची परतफेड वेळेवर होऊ शकली नाही. दिलेला चेक बाऊन्स झाला आणि व्याजासह थकबाकी सुमारे ₹9 कोटींवर पोहोचली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी तिहार जेलमध्ये सरेंडर केल्याची माहिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...