Friday, April 10, 2026
अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी साईबाबा संस्थानला देणगी
शंकर मराठे - मुंबई, १० एप्रिल २०२६ : उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयाला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाची साईबाबांवर मोठी श्रद्धा असून, वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आशियातील सर्वात मोठ्या असलेल्या या प्रसादालयात दररोज सुमारे ५० हजार भाविकांना मोफत भोजन दिले जाते. ही देणगी प्रसादालयातील अन्नदान योजनेसाठी वापरली जाणार असून, यामुळे भाविकांसह रुग्णालय आणि अनाथाश्रमातील भोजन व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. रिलायन्स फाउंडेशनने यापूर्वीही शिर्डी संस्थानाला विविध प्रकल्पांसाठी मोलाची मदत केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment