शंकर मराठे - मुंबई, ९ एप्रिल २०२६ : घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे MCHI कल्याण-डोंबिवली यूनिट तर्फे १६ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान १५व्या प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ₹१६ लाखांपासून ₹१ कोटीपर्यंत विविध किमतींच्या घरांचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
या चार दिवसीय एक्स्पोमध्ये कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, ठाणे आणि शीलफाटा परिसरातील १५० हून अधिक प्रकल्प सादर केले जाणार असून, ४० पेक्षा अधिक विकासक सहभागी होणार आहेत. सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.
स्पॉट बुकिंग सवलती आणि लकी ड्रॉसारख्या आकर्षक ऑफर्समुळे खरेदीदारांना विशेष लाभ मिळणार आहे. तसेच, घरखरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी नगर नियोजन व नोंदणी प्रणालीमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांच्या उपस्थितीची शक्यता असून, घरखरेदीदारांसाठी हा एक्स्पो एक उत्तम संधी ठरणार आहे.

No comments:
Post a Comment