शंकर मराठे - मुंबई, ३ मे २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात भव्य आणि महागडा चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत ऐतिहासिक सुरुवात केली आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या, रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात जवळपास ११.७० कोटींची (मराठी आणि हिंदी मिळून) कमाई केली आहे. पण १०० कोटींचे बजेट आणि डोळे दीपवणारी भव्यता यापेक्षा सध्या सोशल मीडिया आणि प्रेक्षकांमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती एका 'सरप्राईजची'... आणि ते सरप्राईज म्हणजे बॉलिवूडचा भाईजान, सलमान खान!
एकीकडे रितेश देशमुखचा महाराजांच्या भूमिकेतील अभिनय आणि दिग्दर्शन प्रेक्षकांना भावत आहे, तर दुसरीकडे सलमान खानच्या कॅमिओने या चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळवून दिली आहे. 'राजा शिवाजी'ची ही घोडदौड अशीच सुरू राहिल्यास, हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीचे सर्व जुने रेकॉर्ड मोडून काढेल यात शंका नाही.



No comments:
Post a Comment