शंकर मराठे - मुंबई, १० जून २०२६ : आता जणू काही मराठी सिनेमाला सोन्याचं दिवस आले आहे असं वाटतं. आता बघा ना, द महाराष्ट्र फाईल्स नावाचा मराठी सिनेमा १२ जून पासून चित्रपटगृहात दाखल होत आहे. ह्या सिनेमातील कलाकार मंगेश देसाई, ऊषा नाडकर्णी, वीना जामकर, सयाजी शिंदे व इतर आहे, परंतु ह्या मराठी चित्रपटात एक नाही तर तीन-तीन आइटम डान्सर आहेत. सनी लियोन, सपना चौधरी व गौतमी पाटील सारख्या नृत्यांगना ह्या सिनेमात कशा प्रकारचा जलवा दाखविणार आहे, ह्या बद्दल तर नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता लागली असेल.
सनी लिओन: या चित्रपटात सनी लिओन प्रसिद्ध मराठी लोकगीत 'शांताबाई' च्या रिमिक्स व्हर्जनवर धमाकेदार डान्स करताना दिसेल.
सपना चौधरी: हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठमोळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
गौतमी पाटील: महाराष्ट्रात आपल्या डान्सने प्रसिद्ध झालेली गौतमी पाटील या चित्रपटात 'डान्सबार गर्ल' च्या भूमिकेत एका हिंदी गाण्यावर थिरकताना पाहायला मिळेल.
तशी ह्या चित्रपटाचे कथानक रोडच्या कामात आमच्या सगळ्यांच्या जमिनी गेल्या.. सगळ्यांना बक्कळ पैसा मिळाला मग आम्हांलाच कमी का? अशा आशयाचा आहे.


No comments:
Post a Comment