Wednesday, July 29, 2026

साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव


शंकर मराठे - मुंबई, २९ जुलै २०२६ : साईबाबांच्या शिर्डीत आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.. उत्सवानिमित्त साईनगरी भक्तांच्या गर्दीने फुलून गेली असून, सकाळपासूनच साई नामाचा जयघोष करत भाविक साई समाधीसह गुरुस्थानचे दर्शन घेत आहेत. साई मंदिराला फुलांची आणि आकर्षक अशा कलाकृतींची सजावट करण्यात आली आहे. उद्या उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. अनेक पायी पालख्यांच्या माध्यमातून साईभक्त शिर्डीत दाखल होत आहेत. साईबाबांच्या दर्शनानंतर पायी पालखीच्या माध्यमातून शिर्डीत आलेले साई भक्त भावूक झाल्याचं बघायला मिळतंय.


No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...