शंकर मराठे - मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५ : झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे लेखक क्षितिज पटवर्धन दिग्दर्शकीय पदार्पण करतोय हे विशेष. ‘उत्तर ‘ या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटात अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची ही आगळीवेगळी कथा नेमकी आहे तरी काय, याचं ‘उत्तर’ रसिकांना येत्या १२ डिसेंबरला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
उत्तर बद्दल सिनेमाचे दिग्दर्शक सांगतात की, " 'आई' हे सगळ्यात गृहीत धरलेलं, त्यामुळेच जवळचं असूनही दुर्लक्ष होणारं नातं आहे. तिचा फक्त 'व्यक्ती' म्हणून विचार करणारी आणि 'आई व मूल' या नात्याचा नव्याने विचार करायला लावणारी कलाकृती म्हणजेच चित्रपट 'उत्तर' "

No comments:
Post a Comment