Monday, November 3, 2025

'गोंधळ’ सिनेमाचा दिग्दर्शक काय म्हणतोय ?


शंकर मराठे - मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५ : बहुचर्चित ‘गोंधळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी प्रेक्षकांना थेट सांगितलं —“आमचा ट्रेलर बघू नका!”


पण इथेच आहे गोंधळाचा गाभा, कारण ज्या गोष्टी बघू नका असं सांगितल्यावर, ती गोष्ट जास्त बघितली जाते...  म्हणजेच हा एक उलटा प्रमोशन गेम. “नको म्हणलं की अधिक उत्सुकता वाढते”

“कथेमधील रहस्य, पात्रांची उलगडत जाणारी थरारक गाठ — हे थेट मोठ्या पडद्यावर अनुभवावं. ट्रेलर पाहिलात तर थोडा थ्रिल कमी होईल.”पण त्यांना हे पण चांगलंच ठाऊक आहे… हेच म्हणल्यावर अर्धा महाराष्ट्र आधी ट्रेलर बघायला धावेल! असं सिनेमाचे दिग्दर्शक सांगतात.

चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर सोबत दमदार कलाकारांची टीम आहे. 
 

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...