शंकर मराठे - मुंबई, ११ डिसेंबर २०२५ : झी टीव्हीवरील ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता किरण गायकवाड सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बायको वैष्णवी कल्याणकर सोबत गोव्यात सुट्टीचा आनंद लुटत असलेल्या या जोडीचे बीच वरील लव्हली मस्तीभरे फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले आहेत.
फोटोंमध्ये वैष्णवीची स्टायलिश हेअरस्टाईल, मोरजिम बीचचे अप्रतिम दृश्य, स्ट्रीट फूडचा धमाल अनुभव आणि किरणचे काही कँडिड क्लिक्स दिसतात.
सध्या वैष्णवी कल्याणकर ‘काजळमाया’ मध्ये आभा ही भूमिका साकारत असून सोशल नेटवर्किंग साइटवर ती चांगलीच एक्टिव्ह आहे. गोव्याच्या किनाऱ्यावरचे या कपलचे रिलॅक्स वाइब्स नेटिझन्सना खूप भावले.



No comments:
Post a Comment