Sunday, December 14, 2025

निळूभाऊंनी अभिनयाने हिरोपेक्षाही व्हिलनची उंची मोठी केली

शंकर मराठे - मुंबई, १४ डिसेंबर २०२५ :  डोक्यावर पांढरी गांधी टोपी, नेसायला धोतर, तोंडात पानाचा विडा आणि डोळ्यांत ती लंपट, क्रूर नजर... निळू फुले पडद्यावर आले की प्रेक्षकांच्या मनात धडकी भरत असे. कित्येक वर्षे महाराष्ट्रातल्या आया-बहिणींनी टीव्हीवर त्यांना बघून भीतीपोटी चॅनेल बदलले असतील. हा एका अभिनेत्याचा सर्वात मोठा विजय होता!

आजवर अनेक खलनायक झाले, पण निळूभाऊंसारखा "दहशत" निर्माण करणारा नट झाला नाही. निळूभाऊंनी खलनायक काय असतो, हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला शिकवलं. हिरोला हिरो तेव्हाच म्हणतात, जेव्हा समोर व्हिलन तगडा असतो. निळूभाऊंनी आपल्या अभिनयाने हिरोपेक्षाही व्हिलनची उंची मोठी केली. त्यांची अभिनयाची ताकद काय होती? इतर व्हिलन पडद्यावर आरडाओरडा करायचे, हत्यारं फिरवायचे. पण निळूभाऊ? अजिबात नाही. त्यांचा आवाज... तो घोगरा, पण गोडवा असलेला विषारी आवाज. ती नजर... डोळ्यांच्या कोपऱ्यातून जेव्हा ते समोरच्याकडे बघायचे, तेव्हा समोरच्याची काय अवस्था होते हे शब्दांत सांगता येणार नाही. खांद्यावरचं उपरणं सावरत, तोंडातला विडा चघळत जेव्हा ते "बाई..." म्हणायचे, तेव्हा त्या एका शब्दात इतकी लंपटता आणि क्रूरता असायची की, थिएटरमध्ये बसलेल्या महिलांच्या अंगावर काटा यायचा.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...