‘झी मराठी’वर नव्याने सुरू झालेली ‘कमळी’ मालिका या आठवड्यात वाहिनीवर ३.३ रेटिंगसह पहिल्या स्थानी आहे. तर या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर हर्षदा खानविलकर यांची ‘लक्ष्मी निवास’ मालिका आहे. ही मालिका रात्री ८ ते ९ अशी एक तास प्रसारित केली जाते आणि याच्या दोन्ही स्लॉटचा टीआरपी चांगला आहे. तेजश्री प्रधानची नव्याने सुरू झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा ओपनिंग TRP २.९ असून, ‘तारिणी’चा टीआरपी २.७ इतका आहे. या दोन्ही मालिकांना पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही मालिका नवीन असल्याने येत्या काळात या आकडेवारीत आणखी वाढ होईल असं म्हटलं जात आहे.
Saturday, December 13, 2025
‘कमळी’ मालिका रेटिंग मध्ये पहिल्या स्थानी
शंकर मराठे - मुंबई, १३ डिसेंबर २०२५ : 'झी मराठी' चैनलवर नव्याने सुरू झालेल्या 'वीण दोघांतही ही तुटेना' आणि 'तारिणी' या मालिकांच्या TRP ची आकडेवारी आली समोर...‘झी मराठी’ वाहिनीवर ११ ऑगस्ट रोजी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या दोन मालिकांचं ग्रँड लॉन्चिंग करण्यात आलं. यापैकी ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत झळकत आहे. तर, तिच्यासह या मालिकेत सुबोध भावे, पूर्णिमा डे, राज मोरे, किशोरी अंबिये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तेजश्रीचं पुनरागमन असल्याने प्रेक्षकांना या मालिकेकडून प्रचंड अपेक्षा आहेत. याशिवाय ही मालिका सुरू झाल्यावर टीआरपीच्या आकडेवारीत सुद्धा मोठा बदल होईल अशा चर्चा सुरुवातीपासूनच सर्वत्र रंगल्या होत्या. मात्र, दोन मालिकांच्या लॉन्च नंतरही ‘झी मराठी’च्या टीआरपीत फारसा मोठा बदल झालेला नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...


No comments:
Post a Comment