Monday, December 1, 2025

‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचा शुभारंभ ६ डिसेंबर रोजी पुण्यात

 शंकर मराठे - मुंबई, १ डिसेंबर २०२५रत्नाकर मतकरींच्या लेखनाची सहजसुंदर शैली आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. 

भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे व वैभव मांगले अशा ताकदीच्या कलाकारांनी सजलेले हे नाटक रंगभूमीवर नक्कीच धमाल घडवणार आहे.
भूमिका, प्रवेश क्रिएशन्स, असंम्य थिएटर्स निर्मित व रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच निर्माते श्रीकांत तटकरे, मंगल केंकरे व अजय विचारे हे आहेत. हास्याचे वादळ घेऊन येणारे ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचा शुभारंभ ६ डिसेंबर रोजी पुण्यातील भरत नाट्य रंगमंदिर येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...