शंकर मराठे - मुंबई, १ डिसेंबर २०२५ : सेवेन्थ सेन्स मीडिया ची मालिका "वचन दिले तू मला" स्टार प्रवाह वर १५ डिसेंबर २०२५ पासून रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत.
या मालिकेमध्ये अभिनेता मिलिंद गवळी यांनी एडवोकेट हर्षवर्धन जागीरदारची भूमिका साकारली आहे. इतक्या वर्षात अभिनयाच्या क्षेत्रात मिलिंदने पोलीस ऑफिसर, डॉक्टर्स, आर्मी ऑफिसर अमर भोसले, रिटायर्ड कर्नल अजय सावंतराव, आमदार मंत्री पण केले, पण कधी सॉलिसीटर किंवा वकील केला नव्हता.
या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजना बरोबर प्रेक्षकांचं कायद्याविषयी, आपल्या हक्कांविषयी माहिती, प्रबोधन सुद्धा होणार अशी अभिनेता मिलिंद गवळी यांना खात्री आहे.



No comments:
Post a Comment