शंकर मराठे - मुंबई, १९ डिसेंबर २०२५ : जिओ स्टुडिओज् व मुंबई फिल्म कंपनीचा बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ ह्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून आता भव्य पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे उलगडणार आहे.
या सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख हया भव्य कलाकारांची जत्रा पाहायला मिळणार आहे. हया सिनेमात विद्या बालन सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘राजा शिवाजी’ हा सिनेमा १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार असून, मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


No comments:
Post a Comment