Thursday, February 12, 2026

देवमाणूस सीरियल मध्ये अभिनेत्रीची धडाकेबाज एन्ट्री!


शंकर मराठे - मुंबई, १२ फेब्रुवारी २०२६  :  झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि रहस्यमय कथानक असलेल्या 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता या मालिकेत एक नवीन आणि मोठा ट्विस्ट आला असून, एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

​मृणाल साळुंखे हिच्या एन्ट्रीचा प्रोमो नुकताच समोर आला असून, तिचे सौंदर्य पाहून गोपाळच्या नजरेत पुन्हा एकदा वेगळी चमक तरळली आहे. आता 'देवमाणूस'मध्ये तिची भूमिका काय असणार, ती गावात नवीन राहायला आली आहे की गोपाळच्या कोणत्या नवीन कारस्थानाचा ती भाग असणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...