Wednesday, February 11, 2026

अमिताभ यांनी रेखाचा स्वीकार करावा...

शंकर मराठे - मुंबई, १२ फेब्रुवारी २०२६  : नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी 'ड्रामा क्वीन' राखी सावंत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. नुकतेच राखीने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री जया बच्चन व रेखा यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक विधाने केली आहेत. तिच्या या विधानांमुळे सोशल मीडियावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.

राखीने या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या लग्नाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ती म्हणाली की, "अमिताभ बच्चन यांनी जोडीदार म्हणून जया बच्चन यांची निवड का केली, हे मला आजपर्यंत समजलेले नाही. अमिताभ बच्चनकडे अफाट संपत्ती आहे, तरीही जया बच्चन यांचा पेहराव व्यवस्थित नसतो." राखी इथेच थांबली नाही, तर तिने जया बच्चन यांना कपड्यांवरून आणि दिसण्यावरून सल्लाही दिला. ती म्हणाली, "जयाजी, जर तुम्ही मला तुमच्या वाढदिवसाला आमंत्रित केले, तर मी तुम्हाला एक डिझायनर आणि चांगला सूट भेट म्हणून देईन. तुमचे पती हे महानायक अमिताभ बच्चन आहेत, त्यामुळे तुम्ही किमान तुमच्या केसांना कलर तरी लावत जा."

याच संभाषणात राखीने अमिताभ आणि रेखा यांच्या जोडीचे समर्थन केले. तिला जेव्हा विचारण्यात आले की, अमिताभ बच्चन यांच्यासाठी ती कोणाची निवड करेल, तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता अभिनेत्री रेखा यांचे नाव घेतले. राखी म्हणाली, "सध्या समाजात दोन लग्नांचा ट्रेंड रूढ होत आहे. आयुष्य एकदाच मिळते, त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी आता पुढाकार घेऊन रेखा यांचा स्वीकार केला पाहिजे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी ही एखाद्या 'राजा आणि राणी'सारखी शोभून दिसते. याउलट, जया बच्चन या त्यांच्यासमोर अगदीच साध्या, एखाद्या नोकराप्रमाणे भासतात."

​राखीने पुढे हात जोडून अमिताभ यांना विनंती केली की, "कृपया आता तुम्ही जया बच्चन यांना सोडून द्या आणि तुमच्या आयुष्यातील उरलेला काळ रेखा यांच्यासोबत आनंदात व्यतीत करा." राखीच्या या वक्तव्यामुळे अमिताभ व रेखा यांनी एकत्र काम केलेल्या 'सिलसिला' आणि इतर चित्रपटांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या असल्या तरी, तिने जया बच्चन यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे ती वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...