Tuesday, February 10, 2026
जुही चावला यशस्वी 'बिझनेस वुमन'
शंकर मराठे - मुंबई, ११ फेब्रुवारी २०२६ : बॉलिवूडमध्ये साधारणपणे असं मानलं जातं की, जोपर्यंत तुमचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात, तोपर्यंतच तुमची कमाई आणि स्टारडम टिकून राहतं. एखादी अभिनेत्री पडद्यापासून लांब गेली की तिची चर्चा आणि कमाई दोन्ही कमी होते. मात्र, ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला याला पूर्णपणे अपवाद ठरली आहे. श गेल्या १३ वर्षांत एकही मोठा हिट सिनेमा दिलेला नाही. तरीही आज ती देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. जुही चावलाने १९८६ मध्ये 'सल्तनत' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली, पण तिला खरी ओळख १९८८ मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' या ब्लॉकबस्टर सिनेमाने मिळवून दिली. आमिर खानसोबतची तिची जोडी खूप गाजली आणि ती रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिने १०० हून अधिक हिंदी, तमिळ आणि इतर भाषिक चित्रपटांत काम केले. कालांतराने तिने मुख्य भूमिकांऐवजी छोट्या किंवा पाहुण्या कलाकाराच्या भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. मागील १३ वर्षांत तिच्या नावावर एकही सोलो हिट चित्रपट नाही, तरीही तिची आर्थिक प्रगती मात्र थक्क करणारी आहे. जुही चावलाची एकूण संपत्ती तब्बल ४६०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment