Wednesday, February 25, 2026

ह्या विलेनचे नसीब कसं फळफळले ?


शंकर मराठे - मुंबई, २५ फेब्रुवारी २०२६  : 'शोले' चित्रपटाचे नाव काढले की सर्वात आधी डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे विलेन 'गब्बर सिंग'. परंतु, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी अमजद खान हे निर्मात्यांची पहिली पसंती अजिबात नव्हती. जेव्हा डायरेक्टर रमेश सिप्पी यांनी 'शोले' चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू केली होती, तेव्हा गब्बर सिंग या मुख्य खलनायकाची भूमिका सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्जोंगपा यांना देण्यात आली होती. मात्र, डॅनी यांनी त्याच वेळी फिरोज खान यांच्या 'धर्मात्मा' या चित्रपटासाठी आपल्या तारखा दिल्या होत्या. दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगच्या तारखा एकाच वेळी आल्यामुळे वेळेच्या अभावापोटी डॅनी डेन्जोंगपा यांना नाईलाजाने 'शोले' चित्रपटातून बाहेर पडावे लागले व पुढे अमजद खान यांचे नशीब फळफळले.

अमजद खान एका मोठ्या ब्रेकच्या शोधात होते, जेव्हा त्यांची भेट डायरेक्टर रमेश सिप्पी यांच्याशी झाली, तेव्हा सिप्पी यांना अमजद यांचा चेहरा खूपच वेगळा आणि प्रभावी वाटला. त्यांनी अमजद यांना भूमिकेसाठी दाढी वाढवण्याचा सल्ला दिला आणि हाच छोटासा संकेत अमजद खान यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या भूमिकेमध्ये पूर्णपणे परकाया प्रवेश करण्यासाठी त्यांनी आपली दाढी वाढवली, स्वतःचे दात काळे केले आणि आपला संपूर्ण लूक बदलून टाकला. जेव्हा ते स्क्रीन टेस्ट देण्यासाठी गेले, तेव्हा ते संपूर्णपणे गब्बर सिंगच्या रूपात तिथे पोहोचले होते आणि त्यांचा तोच खतरनाक लूक पाहून त्यांना ही ऐतिहासिक भूमिका मिळाली.


No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...