Tuesday, February 17, 2026

गौतमी पाटील अडकली विवाहबंधनात ?

 


शंकर मराठे - मुंबई, १८ फेब्रुवारी २०२६  : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे आणि चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे – खरंच का महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार राऊत आणि महाराष्ट्राची नृत्यांगना गौतमी पाटील विवाहबंधनात अडकले? व्हिडिओमध्ये दोघेही नवरा-नवरीच्या वेशात दिसत आहेत आणि लग्नानंतर उखाणा घेताना त्यांची केमिस्ट्री पाहून अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षावही केला आहे.

मात्र या सगळ्यामागचं सत्य थोडंसं वेगळं आहे. हा व्हिडिओ त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाचा नसून एका नव्या संगीतमय अल्बम गाण्यासाठी  शूट करण्यात आला आहे. एक जुने गाजलेले गाणे नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात ओंकार आणि गौतमी यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

व्हिडिओमध्ये दोघांची जोडी इतकी नैसर्गिक आणि आकर्षक वाटते की अनेक चाहत्यांना ते खरंच लग्न करत आहेत असं वाटलं. गौतमीच्या डान्ससोबत ओंकारची भन्नाट स्टाईल या गाण्यात पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.


No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...