Sunday, March 22, 2026

श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत?


शंकर मराठे - मुंबई, २२ मार्च २०२६ : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या व्यावसायिक यशा सोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि प्रसिद्ध लेखक-फिल्ममेकर राहुल मोदी यांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर मोठे उधाण आले आहे. चाहत्यांमध्ये या जोडीच्या लग्नाबाबत प्रचंड उत्सुकता असतानाच, आता अभिनेत्रीची मावशी व ज्येष्ठ अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे यांनी या प्रकरणावर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना नवीन वळण मिळाले आहे.

बॉलीवूड सेलिब्रिटींच्या लग्नाबाबत गुप्तता पाळणे ही काही नवीन गोष्ट नाही. तेजस्विनी कोल्हापुरे यांनी जरी लग्नाच्या वृत्ताचा इन्कार केला असला, तरी श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांची केमिस्ट्री पाहता, आगामी काळात चाहत्यांना सुखद धक्का मिळू शकतो, असे वाटते.


No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...