Wednesday, March 4, 2026

केदारच्या लग्नांच्या हटके प्रपोजलमुळे तारिणीच्या आयुष्यात पुढे काय होणार?


शंकर मराठे - मुंबई, ५ मार्च २०२६ : ‘तारिणी’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना थरारक वळण पाहायला मिळत आहे. स्पेशल क्राइम युनिटमध्ये काम करणारी तारिणी आणि केदार यांनी एका मिशनसाठी खोटं लग्न केल्याची गोष्ट पुढे आली होती. मात्र हे सत्य तारिणीची बहीण निशीला समजताच परिस्थिती बदलली. निशी, युवराज आणि त्याच्या आईने दोघांचं खरं लग्न लावून देण्यासाठी योजना आखली. आधी कोर्ट मॅरेज झाल्यामुळे सर्वांसमोर पुन्हा लग्न करण्याचा विषय पुढे आला, पण तारिणी आणि केदार विविध कारणांनी टाळाटाळ करत होते.

आता नव्या प्रोमोमध्ये मोठा ट्विस्ट दिसतो. होळीच्या निमित्ताने दोघे समोरासमोर येतात. केदार तारिणीला सांगतो की ते एका जाळ्यात अडकले आहेत आणि या सगळ्यामागे निशीच्या बोलण्यामुळे आखलेला प्लॅन आहे. यानंतर तारिणी स्पष्टपणे लग्नासाठी तयार असल्याचे सांगते आणि साथ देणार का, असा प्रश्न केदारला विचारते. त्यावर केदार खास अंदाजात प्रपोज करत म्हणतो, “बेलसरेंच्या मुलीचा हात मागतोय देवकीचा हा केदार.” तारिणीही हसत होकार देते.

केदारच्या लग्नांच्या हटके प्रपोजलमुळे तारिणीच्या आयुष्यात पुढे काय होणार? मालिकेतील पुढील भागांविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे.

No comments:

Post a Comment

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार

शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाज...