Wednesday, April 22, 2026

सिनेमा 'राजा शिवाजी' मधील 'वाघ नखं' सीनवरून वाद


शंकर मराठे - मुंबई, २३ एप्रिल २०२६ : अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला एकीकडे उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच, दुसरीकडे ट्रेलरमधील एका विशिष्ट दृश्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अफझल खान वधाच्या प्रसंगात दाखवण्यात आलेल्या 'वाघ नखांच्या' सीनवरून एका नेटकऱ्याने रितेशवर इतिहासाची मोडतोड केल्याचा थेट आरोप केला आहे. या वाढत्या टीकेवर आता खुद्द रितेश देशमुखने मौन सोडत टीकाकाराला थेट उत्तर दिले आहे. उत्तर देताना रितेशने लिहिले, "आदरणीय सर, कृपया १ मे रोजी हा चित्रपट नक्की बघा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातच आहे. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घ्याल. जय शिवराय!

No comments:

Post a Comment

सिनेमा 'राजा शिवाजी' मधील 'वाघ नखं' सीनवरून वाद

शंकर मराठे - मुंबई, २३ एप्रिल २०२६ : अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' चित्रपटाचा ट्रेल...