Tuesday, April 21, 2026
जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार
शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या भव्य सोहळ्याला सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टने उपस्थिती लावली होती.
या भव्य चित्रपटात रितेश देशमुखची पत्नी तसेच प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती जिनिलीया देशमुख हिने सईबाई राणीसाहेब यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या विशेष सोहळ्यासाठी जिनिलीया ने अस्सल मराठमोळा आणि पारंपरिक शृंगार केला होता. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, गळ्यात पारंपरिक हार, नाकात नथ, केसात सुंदर गजरा आणि कपाळावर रुबाबदार चंद्रकोर अशा मनमोहक वेशात ती अतिशय सुंदर दिसत होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी तिचे आगमन होताच चाहत्यांनी आणि उपस्थितांनी "वहिनी…वहिनी" अशी साद घालत तिला हाक मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर, जेव्हा माध्यमांशी संवाद साधण्यासाठी 'राजा शिवाजी' ची संपूर्ण स्टारकास्ट मंचावर गेली, तेव्हा जिनिलीया मंचाखालीच उभी होती. हे पाहताच रितेश अतिशय घाईने पत्नीजवळ पोहोचला आणि त्याने प्रेमाने तिचा हात धरून तिला स्वतः मंचावर नेले. या जोडीच्या या निखळ प्रेमाचा आणि गोड क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ऐतिहासिक चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांची मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार
शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाज...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment