Tuesday, April 21, 2026

राजा शिवाजी ह्या ऐतिहासिक सिनेमात अनेक दिग्गज कलाकार


शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी राजा शिवाजी हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे खास औचित्य साधून संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रितेश देशमुख याने या चित्रपटात स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली असून, या भव्य चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. विशेष म्हणजे, त्याची पत्नी जिनिलिया देशमुख ही देखील या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 


हया ऐतिहासिक सिनेमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांसारख्या अतिशय मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी यांच्याही अतिशय महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी भूमिका या चित्रपटात आहेत.

No comments:

Post a Comment

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार

शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाज...