Monday, April 13, 2026

श्री स्वामीच्या रूपात पुन्हा एकदा मोहन जोशी


शंकर मराठे - मुंबई, १३ एप्रिल २०२६ : "देऊळ बंद २ आता परीक्षा देवाची...!!!" या अत्यंत दमदार टॅगलाईनसह हा चित्रपट रुपेरी पडद्यावर २१ मे २०२६ रोजी दाखल होत आहे. पहिल्या भागातील कोणकोणते सुप्रसिद्ध चेहरे या नव्या भागात झळकणार, याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता लागून राहिली होती. पण याहीपेक्षा सर्वांचे सर्वाधिक लक्ष एकाच गोष्टीकडे लागले होते, ती म्हणजे या चित्रपटात श्री स्वामी समर्थांची अत्यंत महत्त्वाची भूमिका नेमकी कोण साकारणार? अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून, एका खास मोशन पोस्टरच्या माध्यमातून स्वामींचे दिव्य दर्शन आणि तो चेहरा आता समोर आला आहे.

पहिल्या 'देऊळ बंद' चित्रपटात ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामींची भूमिका अत्यंत ताकदीने निभावली होती आणि त्यांच्या या अविस्मरणीय कामाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. आता या दुसऱ्या पर्वातही मोहन जोशी हेच पुन्हा एकदा स्वामींच्या अद्वितीय रूपात प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...